slots.us.org परेश नीति | The Top Post !

परेश नीति


परेश नीति


गोष्ट पहिली :


खुप वर्षां पूर्वीची गोष्ट...एक आटपाट नगर होत...सर्व सुरळीत चाललेले असते, आलबेल असते.

...अचानक एके भले सकाळी दिवशी राजवाड्याला बेसुमार आग लागते. सैनिक आग विझवण्यासठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते...नागरिक ही त्याना मदत करत होते. तरीसुद्धा आग काही कमी होत नव्हती...तेवढ्यात एक कोकिळा जवळच्या झाडावर बसून गायला लागते. तिचे कुजन  ऐकून एका सैनिकाला प्रचंड राग येतो.  तो रागाच्या भरात एक दगड तिच्या दिशेने भिरकावतो व तो लागून ती कोकिळा मरते.

हे बघुन दुसरा सैनिक त्याला विचारतो "तू तिला का मारलं स? "

तेव्हा पहिला उत्तरला " अरे इथे आग लागलीय आणि ही खुशाल गातेय ...".

यावर दूसरा म्हणाला " अरे प्रत्येक प्राणी एक विशिष्ट काम घेउन जन्माला आलेला असतो. कोकिळेचं काम हे गाणं  , आपल काम आग विझवणं. ती कशी काय आपलं  काम करू शकेल?"गोष्ट दूसरी :

आमच्या शेजारचं  घर गोखल्याचं. रिटायर्ड झालेले असल्याने काका दिवसभर टिव्ही बघत बसत...दूसरा काही विरंगुळाच नव्हता..उभं आयुष्य पोस्टात गेल्याने एखादा छंद जडण्याचा  काही संबंध नव्हता ...नाही म्हणायला एक कुत्रा बाळगलेला होता, ज्याला ते संध्याकाळी फिरायलाही घेउन जात असत...

एके दिवशी सकाळी अकराच्या सुमारास काका लगबगीने घराबाहेर पडत होते. काकुंचा पाठून आवाज ऐकू येत होता " अहो कुठे जाताय? निदान काही खाऊन तरी जा...आणि हो जातच आहात तर भाजी घेउन या ...टोपी विसरलात ..."

हे म्हणेपर्यंत काका गेटच्या बाहेर देखील पडले होते...सुमारे एका तासानंतर परत आले ते खुप काही खरेदी करून... त्यात काही पुस्तक होती, एक चामड्याचा पट्टा व वेताची छड़ी देखिल ... काकुंच्या काहीच लक्षात न आल्यावर ते म्हणाले " अग मी रिकाम टेकडा दिवसभर काहीच विरन्गुळा नाही ..आज ज्यावेळी टिव्ही वरच्या बातम्या बघितल्या आणि ठरवल....आपण मुंबईत रहातो..आपण मराठीच बोलले पाहिजे व सर्वानी मराठीच बोलले पाहिजे हे पटलं ..पण आपण दोघ तर मराठीच बोलतो , मग कुणाला बर मराठी बोलायला लावायाचं  असा प्रश्न पडला होता…

..आणि मग लक्षात आलं की आपला कुत्रा टॉमी कुठे मराठी बोलतो?"


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !