slots.us.org एक संवाद : | The Top Post !

एक संवाद :एक संवाद :


वि लॉस्ट राव : राम राम आबा. काय म्हणता? कस हाय गावाकड़ ? वहिनी कशा आहेत ?


आरं आरं आबा : (खाटेवरुन उठून थुकुन येतात... ) राम राम पाव्हण ! नेमकी मळि लावली आणि तुमि फोन केला बघा .. हिकड़ समदी बरी हैती ... तुमची अनिक वैनी सायबांची लई आठवण काढतिया ... बाकी समद बर नव्ह ? कुठे हाइसा ?

वि लॉस्ट राव : अहो, CST वर आहे, लातूर एक्सप्रेस मधे बसलोय , (हसत ) मी पण लातुरच तिकिट काढल . गाडी लेट होती म्हटल तुम्हाला फोन करावा ...

आरं आरं आबा : लई बेस कल बघा ... मी पण हीथ कटाल्लो होतो .. पद गेल्यापासून गावच कुत्र पन भिक घालेना ! खाटेवर बसून "शरदाच चांदणे" बघत होतो ! ही म्हणते मी आता "होम मिनिस्टर " मधे जाणार (दोघेही हसतात)

वि लॉस्ट राव : राव तुम्ही तिडिकित राजीनामा दिलात , आम्हाला पण जाव लागल ... तरी मी तुम्हाला सांगितल होत खुर्चीला फेविकोल लावून ठेवा .. आता आहे परत मिळेल का नाही माहीत नाही ....

आरं आरं आबा : अहो किती वेळा नाही म्हणु म्हटल राजीनामा द्यावा एकदाचा , इकडे दहशत वादी तिकडे लखोबा, कन्टाळलो या राज कारणाला.. म्हटल निवांत गावाकड़ शेती बघावी ...

वि लॉस्ट राव : कही म्हणा राव पण आपण रिकॉर्ड केल...एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री, दोघानी ही जाण, ते सुद्धा वेग वेगळ्या पक्षाचे हे अस पहिल्यांदाच झाले..

आरं आरं आबा : वेळच वाकडी त्याला काय कराच्च? मग आता काय उद्योग ? म्हणा तुमच बर आहे राव दोन्ही मुलाना कामाला लावले , आता बसून खायाच, कंटाला आला तर पोराच्या सिनेमाची तिकिट ब्लैक करायची...

वि लॉस्ट राव : कसली ब्लैक करायची डोम्बल? त्यासाठी पिक्चर चालवा लागतो ! असो , ठंडी ओसरली की या हुरडा खायला लातुरला ! नंतर बघू पुढल्या निवडणुकिच...

आरं आरं आबा : येवू की.. मी पण बघतोय एखादा वाइन पार्क टाकतो...

वि लॉस्ट राव : तुम्ही हे करणार ?

आरं आरं आबा : वेळ आली की सगळ कराव लागताया..उद्या डांस बार भी काढावा लागल.. काय नेम नाय.. सगळ पाप शेवटी विठ्ठलाच्या पायाशी घालायच..तोच करता करविता... औंदा पुजाबी चुकलिया... दूसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश आणि हिंदी चा क्लास लावतोया बघा .. साहेब म्हणतात खेड्यातल्या माणसाची इंग्लिश बोलण्यात चुक होऊ शकते ... असो

वि लॉस्ट राव : असो ... आता काय भेटूच ...दोघानाही वेळच वेळ आहे ...अधून मधून आठवण ठेवा म्हणजे झाल... चला आबा ट्रेन सुटते .. फोन ठेवतो ...राम राम !

आरं आरं आबा : Good Night and Happy Journey !
No comments:

Post a Comment

Thank you for visiting !