slots.us.org तू अन् मी .... | The Top Post !

तू अन् मी ....


तू अन् मी ....


एक झोपाळा,
माझ्यासारखा !
कुणासाठी तरी
झुलत रहाणारा....

एक कळी,
तुझ्यासारखी !
कुणासाठी तरी
उमलणारी....

एक झरा,
माझ्यासारखा !
कुणासाठी तरी
वाहत रहाणारा....

एक चान्दणी,
तुझ्यासारखी !
कुणासाठी तरी
तेजोमय होणारी ....

एक झुळुक,
तुझ्या माझ्यासारखी !
स्वतः दमून
दुसऱ्याला सुखावणारी ....

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !