slots.us.org Rose - a story of 87 year young student | The Top Post !

Rose - a story of 87 year young student
रोझ
आमच्या कॉलेजचा पहिलच दिवस होता. प्रोफेसरांनी स्वतःची ओळख करुन दिली. नंतर आपण ज्यांना ओळखत नाही अशा नवीन लोकांशी ओळखी करुन घेऊन त्यातुन नवीन मित्र, मैत्रीणी शोधायचे आवाहन केले. मी आजुबाजुला बघतच होते तोच एक हात अलगदपणे माझ्या खांद्यावर येऊन विसावला.एक वृद्ध आजीबाई माझ्याकडे हासर्या नजरेने बघत होत्या. त्यांच्या हास्यातुन जणु काही आनंद थुई थुई नाचत होता. त्यांच्या या एका हास्याने जणुकांही माझे मन उजळुन निघाले होते.' हाय सुंदरी! माझे नांव रोझ! मी 87 वर्षांची आहे! मी तुला 'ह्ग' करु शकते?''ओ! श्युअर!' मी हसुन उत्तर दिले आणि त्या आजीबाईंनी मला प्रेमने अलींगन दिले.


'या इतक्या लहन वयात तुम्ही कॉलेजमधे कशा?' मी काहीशा मिस्कीलीनेच त्या आजीबाईंना विचारले.'मी इथे एखादा श्रीमंत तरुण नवरा म्हणुन मीळतो का हे बघायला आले आहे. मिळाला तर लग्न करुन दोन एक मुलांची आई व्हायचा विचार आहे.' त्या आजीबाई पण मिस्कीलपणे उत्तरल्या.'खरच?' मला आश्चर्य वाटत होते की या वयांत या आजीबाईंच्या डोक्यात असा विचार कसा आला?'मला कॉलेजमधे शिकायची इच्छा होती, ती आता पूर्ण होत आहे!' त्या आजीबाई म्हणाल्या.क्लास संपल्यावर आम्ही दोघी स्टुडन्ट युनीयन बिल्डींगमधे गेलो व चॉकलेट मिल्क शेक शेअर केले.
लौकरच आम्ही दोघी जिवा भावाच्या मैत्रीणी झालो. या 'टाईम मशीनचे' शहणपणाचे आणि अनुभवाचे बोल ऐकुन मी नेहमीच प्रभावीत व्हायचे.या एका वर्षाच्या काळांत रोझ आमच्या कॉलेजची 'आयकॉन' बनली. ती नेहमीच सगळ्यांशी सहज ओळखी करुन घेत असे. तिला कॉलेजमधल्या मुलींसारखे छान छोकीचे व आधुनीक कपडे घालणे आवडत असे. ती कॉलेजचे लाईफ चांगले इन्जॉय करत होती.


सेमीस्टरच्या शेवटी आम्ही रोझला आमच्या फुटबॉल पार्टीमधे छोटे भाषण देण्यासाठी निमंत्रीत केले. तिथे आम्हाला तिने जे शिकवले ते मी आयुष्यांत विसरु शकणार नाही. तिची ओळख करुन दिल्यावर ती स्टेजवर भाषण देण्यासाठी आली. तिने भाषण लिहुन आणले होते. पण काहीतरी गडबड झाली. तिच्या हातातुन तो कागद कोठे पडला कुणास ठाऊक!


भाषणाचा कागद सापडत नाही म्हणुन आधी ती थोडी वैतागली, मग मायक्रोफोन समोर आली आणि बोलायला लगली, ' बघा किती येडपट आहे मी! मझा भाषणाचा कागदच हरवला बघा! काय करणार! बीअर पिण्याची सवय केव्हाच मोडली! आज कधी नाही ते व्हिस्की ढोसली. मेंदुचा पार भुगा झाला बघा! आता जरी मला कागद मिळाला तरी काय वाचता येणार कपाळ? मला काय सांगायचे आहे ते सरळच सांगते'तिच्या या भाषणाने मुलांनी गिल्ला केला नसेल तरच नवल! तिने आवाज चढवला आणि बोलायला सुरवात केली.


'आपण वृद्ध झालो म्हणुन कोणी खेळण्याचे थांबवत नाही. उलट आपण खेळत नाही म्हणुन वृद्ध होतो.तरुण रहण्याची, आनंदी असण्याची, यशस्वी होण्याची फक्त चारच 'सिक्रेट्स' आहेत. तुम्ही रोज हसले पाहीजे आणि त्यासाठी रोज विनोद 'humor' शोधला पाहिजे. तुमच्या डोळयांत सतत काहीना काहीतरी स्वप्ने पाहिजेत. जेव्हा तुमची स्वप्न संपतात तुमचा मृत्यु होत असतो.असे मृत्यु पावलेले अनेक लोक आपल्या आजुबाजुला असतात पण त्यांना हे माहीत नसते.मोठे होणे आणि वयाने मोठे होणे यांत फार फरक आहे!


तुम्ही एकोणीस वर्षांचे असाल. एक वर्ष कांहीही न करता तुम्ही बेडमधे नुसते झोपुन राहीलात तरी तुम्ही आपोआप वीस वर्षांचे व्हाल. आज मी सत्याऐंशी वर्षांची आहे. मी एक वर्ष काही न करता झोपुन राहीले तरी आपोआप अठ्याऐंशी वर्षांची होईन.वय वाढण्यासाठी फार प्रयास करावे लागत नाहीत. सगण्यांचीच वये वाढत असतात. पण तुम्हाला जर खर्या् अर्थाने मोठे व्हायचे असेल तर स्वतःमधे सतत बदल घडवण्याच्या 'अपॉर्च्युनीटीज' शोधा. त्याबद्दल कधीही 'रिग्रेट' बाळगु नका.


वृद्ध मंडळींना त्यांनी केलेल्या कृत्याचा रिग्रेट कधीच होत नसतो. पण मनांत असुन ज्या गोष्टी करायला मिळाल्या नाहीत याचा रिग्रेट मात्र जरुर असतो. ज्यांच्या मनांत सतत खेद असतो ते लोक मरणाला घाबरत असतात.तुमची रोझ' असे सांगुन तिने भाषण संपवले.तिने आम्हाला एक कवीता शिकवली. ही कवीता कधीही विसरु नका, रोज या कवीतेची आठवण ठेवा असे तिने आम्हा सगळ्यांनाच आवर्जुन सांगीतले.


वर्षाच्या शेवटी तिला हवी होती ती कॉलेज डिग्री मिळाली.त्यानंतर एका आठवड्याने रोझचे झोपेत शांतपणे निधन झाले.


(दिलीप जोशी अमेरीका यांनी शेअर केलेल्या मूळ इंग्रजी कथेचे स्वैर मराठी रुपांतर)


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !