Some of my facebook status update (Fine arts)


Some of my facebook status update (Fine arts)




"Some good quotes from Castle - Dial M for Mayor :
1. There are times when a well placed pawn is worth more than a king.
2. This is politics. Perception is reality. The truth won't matter."

_______________


"Why is it always the family value guys that get caught with their pants down? -Backett.
Because the universe loves irony. and most people are hypocrites. - Castle"

________________

"‎"Minority groups are more comfortable in silence..."
                                              - Major General Sosabowski ( A bridge too far, 1977)"

__________________






"बंगळूरला बसचा कंडक्‍टर असलेला "तो' त्याच्या "स्टाइल'मुळे प्रवाशांमध्ये एवढा प्रसिद्ध होता की खास त्याची ती "स्टाइल' पाहायला मिळावी म्हणून प्रवासी तो नसलेली बस सोडून द्यायचे आणि "तो' असलेल्या बसमधूनच जायचे... हीच "स्टाइल' आज त्या कंडक्‍टरचा "ट्रेडमार्क' बनली आहे आणि हा कंडक्‍टर आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आहे. त्याचे नाव अर्थात (च) रजनीकांत!

_______________




"१९४१ मध्ये अत्रे नाटय़परिषदेचे अध्यक्ष झाले. मुंबईतल्या ३२व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी या अपयशाचं परखड विश्लेषण केलं. त्यात त्यांनी रंगभूमीच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे सांगितली.


१. बोलपटांच्या स्वस्त करमणुकांचे आक्रमण

 २. तोच तोचपणा, तीच नाटके तेच नट

 ३. वास्तववादाचा अभाव

 ४. संगीतातिरेक 

५. वस्तुनिष्ठ टीकाकारांचा अभाव
 ६. नाटय़ाभिनयाचे शिक्षण देणाऱ्या विद्यालयांचा अभाव........(Lokprabha 28th may 11)



___________________


"‘तुम्ही मला तरुणांच्या ओठांवरची गाणी सांगा, मी तुम्हाला त्या देशाचे भविष्य सांगेन’ - इंग्रज कवी शेले"


_________________


"केवळ विनोदी आणि त्यातही बिनडोक विनोदी कार्यक्रम पाहून ' दात काढणारी ' ही पिढी , भले पैसा कमावत असेल , परंतु त्यांच्या सांस्कृतिक जाणिवा अगदीच अशक्त आहेत. छोट्याशा संकटातही ते कोलमडून पडू शकतात. वाचनातून , मंथनातून मिळणाऱ्या वैचारिक श्रीमंतीचे मोल नव्या पिढीला पटवून देण्यात मराठी समाज फार कमी पडतो आहे. नगरकर यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच बोचरी आणि बोलकी आहे. मराठीचा कैवार घेणारे नेते याबाबत काही करतील अशी अपेक्षाच नाही. स्वतः मराठी समाजानेच मराठी साहित्य , साहित्यिक जाणिवांची जोपासना केली पाहिजे.

- जर्मन सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्यावर लेखक किरण नगरकर यांनी व्यक्त केलेली खंत"

_____________________




या सगळ्यांमागे मराठी वाचनसंस्कृतीचा दोष आहे असं वाटतं का तुम्हाला ?


महेश एलकुंचवार : मराठीत वाचन संस्कृती आहे कुठे ? ती होती तरी का ? असा संशय येतो आता. बंगालमधील पुस्तक मेळ्यांमध्ये जा. लोक रांगा लावून पुस्तक विकत घेतात. गर्दी होते , कोट्यवधींची उलाढाल होते. आपल्याकडे चांगल्यात चांगल्या लेखकाच्या हजार प्रती खपायला पाच वर्षे लागतात. पुस्तक मेळाव्यात ' निळा सावळा ' कुणी मागत नाही. सगळी मागणी ' सुखी व्हायचं कसं ? ' , ' मधुमेहाला आवरायचं कसं ? ' असल्या पुस्तकांना असते.



मराठी माणसाच्या घरात डोकावा , पुस्तकं दिसतात कुठे ? ना शेल्फ , ना कपाट. काय तर म्हणे पुस्तकं महाग झाली. सिनेमॅक्समध्ये जाऊन पाचशे रुपये देऊन चित्रपट बघता येतो. पुस्तक मात्र घेता येत नाही. उधारीवर आणलेली पुस्तकं वाचून वाचन संस्कृती तयार होत नाही. ही समज मराठी लोकांमध्ये जेव्हा येईल तेव्हा वाचन संस्कृतीला बळ मिळेल.



No comments:

Post a Comment

Thank you for visiting !