slots.us.org Some of my facebook status update (System Administration) | The Top Post !

Some of my facebook status update (System Administration)Some of my facebook status update (System Administration)"प्रत्येक कामासाठी योग्य माणसाची निवड करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना अधिकार द्या, त्यांना त्यांचे काम त्यंच्या पद्धतीने करायची पूर्णपणे मोकळीक द्या

.............आणि तुम्ही शांतपणे खिडकीबाहेर बघत बसा. रिझल्ट्स आपोआप येतील."

_____________कुठलीही संस्था सुरळीत चालायची असेल, तर तिला शिस्त ही असावीच लागते,
.............पण ती लावण्याचे अप्रिय काम जे करतात ते काही वेळा अनेकांना सलत राहतात."

____________
"राष्ट्रउभारणीसाठी राजकारण, क्रीडा आणि सिनेमा यापेक्षाही भारताला आता 'अभियांत्रिकी आणि विज्ञान' क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखविणाऱ्या नेतृत्त्वाची गरज आहे - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग"


_______________


"एसटी सेवा हळूहळू वाढत , विस्तारत गेली . ' गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी ' अशा घोषणा झाल्या . गावोगावी एसटी पोहोचलीसुद्धा . शिक्षणप्रसार झाला . खेड्यातली पोरं शिकायला शहरात जाऊ लागली . अशा मुलांचे जेवणाचे डबे एसटी मोफत नेऊ लागली . फणसाचा घमघमाट घेऊन कोकणातून मुंबईकडं एसटी धावू लागली . आंब्याच्या सीझनमध्येही तसाच अनुभव येऊ लागला . म्हैस व्यायल्यावर खरवस घेऊन जाण्यासाठी एसटीच उपयोगी पडू लागली . एसटीनं खेडी आणि शहरांमधले ऋणानुबंध वाढवले . एसटीनं प्रवासी वाहतूकच केली नाही , तर माणसांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं .

article link : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17435162.cms"________________


भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबर भ्रष्टाचारामागची कारणे शोधण्याची धडपड सुरू झाली. प्रमुख विश्वविद्यालयांनी याबाबतचे प्रकल्प हाती घेतले. हार्वर्ड विश्वविद्यालयातील मॅग्नस टॉर्फसन व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाच देण्या-घेण्यामागची मानसिकता शोधणारा निबंध ‘सोशल सायकॉलॉजिकल अ‍ॅण्ड पर्सनॅलिटी सायन्स’ या जर्नलला सादर केला.

लाच देण्याची ऊर्मी व बक्षिसी देण्याची इच्छा यामध्ये काहीतरी संबंध असावा असे टॉर्फसन यांना वाटत होते. बक्षिसी ही वाटते तितकी सरळ कृती नाही. त्यामागे गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया असते. बक्षिसी देण्याची पद्धत अगदी राजेरजवाडय़ांपासून सुरू असली तरी आधुनिक युगातील त्याचे स्वरूप हे लंडनमध्ये ठरले. लंडनमधील वायदे बाजारात कॉफी हाउसमध्ये चटकन कॉफी पिऊन पुन्हा बाजारात बोली लावण्यासाठी जाण्याची घाई व्यापारांना असे. तेव्हा कॉफी हाउसमध्ये दरवाजातच एक पेटी ठेवण्यात आली. त्या पेटीत आधी पैसे टाकणाऱ्याला प्रथम कॉफी मिळत असे. यातून कॉफी हाउसला फायदा होई व व्यापारांना लवकर कॉफी मिळे.

Ref: http://tinyurl.com/bakshis


________________"................ आपल्याकडे हॉटेलात असं होत नाही. गळ्याला टाय बांधल्यामुळे स्वत:ला गव्हर्नर समजणारा एक माणूस ऑर्डर घ्यायला टेबलापाशी उभा राहतो. हातातल्या मळक्या वहीवर पेन टेकवतो आणि ‘बोलो..’ म्हणून दरडावतो. ‘बोलो..’ म्हणताच आपले हात-पाय थंड पडतात. कलकली सुटते. मिनिटाभरात ऑर्डर दिली नाही तर गव्हर्नर आपल्याला पदच्यूत करतील, धक्के मारून बाहेर काढतील म्हणून आपणघाबरतो.

‘चिकन शहाजानी’ किंवा ‘पहाडी पनीर’ असल्या थिल्लर नावाचं काहीतरी मागवतो. आपण खातो आहोत ते चिकन, पनीर की सुरण- असा वाद न घालता या जेवणाचा आपल्याला आनंद होतो आहे असं स्वत:ला बजावत ते निमूट गिळतो. रात्री झोपण्यापूर्वी आनंदाची अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून गोळी खाऊन झोपतो. असो!..............."

http://tinyurl.com/9d42vwe"


___________


आपल्याकडे पत्ता सांगताना घर फक्त चार पावलांवर असते, खाद्यपदार्थात मीठ चिमूटभर असते आणि आपल्याला कोठूनही कोठेही पाच मिनिटांत पोहोचता येत असते. परंतु घर शोधताना ते कोणाच्या चार पावलांवर आहे, हे आपण सांगत नाही. ........

हे सगळे दोष अर्थातच निरुपद्रवी पातळीवरचे आहेत. म्हणजे चार पावलांची चाळीस पावले झाली म्हणून बिघडत नाही आणि चिमूट चमच्याइतकी मोठी झाली तर पदार्थ खारट होण्यापलीकडे काही फार मोठे नुकसान होत नाही. परंतु हा अचूकतेचा अभाव जगण्याच्या सर्वच क्षेत्रांना ग्रासू लागला तर गंभीर समस्या निर्माण होते आणि आपण त्या अवस्थेतून आता जात आहोत. अर्थव्यवस्थेबाबतचा आपला अंदाज चुकतो, गरिबांचे आणि गरिबीचे प्रमाण नक्की किती आहे ते आपल्याला कळत नाही आणि औद्योगिक उत्पादनाबाबत सरकारच्या सांख्यिकी विभागाने तयार केलेल्या आकडेवारीतही आपला गोंधळ असतो. Read more at : Editorial Loksatta 29th June 12"________________


अकोला जिल्ह्यामधे राहतो. माझे वय ३८ असून मला तीन लहान मुले आहेत. मजुरी करत असताना बरोबरच्या कामगारांमुळे गुटखा खाण्याची सवय मला विसाव्या वर्षी लागली. दिवसाला किमान दोन गुटख्याची पाकिटं मी खातच होतो. सहा महिन्यांपूर्वी मला तोंड आलं. वैद्यकीय तपासण्यानंतर तो कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही उपचाराअंती मी बरं होण्याची शक्यता फक्त ३० ते ४० टक्के आहे.

अशिक्षित असल्याने गुटख्यावरचा वैधानिक इशारा , कॅन्सर याविषयी मला काहीच माहिती मिळू शकली नाही. गुटखा-तंबाखूमुळे जर कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो , हे सिध्द झाले आहे तरीही गल्ल्यागल्ल्यांमध्ये हे विष विकण्याची परवानगी का देण्यात येत आहे ? आज लहान मुलांनाही गुटखा-तंबाखू सहज उपलब्ध होतो , करोडो लोक गुटखा खाऊन कॅन्सरला बळी पडणार असतील तर सरकारची त्यांच्याविषयी काही जबाबदारी आहे की नाही.
मला माहिती नाही की मी बरा होईन की नाही. मी किती जगेन याचीही मला शाश्वती नाही परंतु , गुटखा-तंबाखूवर बंदी घालून करोडो लोकांचा जीव वाचवण्याचे कार्य सरकारने करावे , ही माझी विनंती आहे. मी तसं पत्रच पंतप्रधानांना लिहलंय.

- शेख अमीन नईमुद्दीन शेख , अकोला Source: Maharashtra times."

_______________


"Australia’s highest court on Wednesday upheld the world’s toughest law on cigarette promotion, meaning tobacco companies will be prohibited from displaying their logos on cigarette packs that will instead feature images of cancer—riddled mouths, blinded eyeballs and sickly children.

The High Court rejected a challenge by tobacco companies who argued the value of their trademarks will be destroyed if they are no longer able to display their distinctive colours, brand designs and logos on packs of cigarettes.....

http://www.thehindu.com/health/fitness/article3775833.ece"

_______________‎' धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचा अधिकार नाही', असा स्पष्ट निर्णय २४ जानेवारी २०१२ रोजी दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. या निकालपत्रात न्यायमूर्तीनी म्हटले आहे की, 'धर्मस्थानांमध्ये अगदी वर ध्वनिक्षेपक लावलेले असतात. त्यांचे तोंड बाहेरच्या बाजूला असते. त्यामुळे ते लावले की, बऱ्याच मोठ्या परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो. हा त्रास म्हणजे सर्वसामान्यांच्या शांततापूर्ण जगण्यात हस्तक्षेप आहे. कोणालाही इतरांना उपदव देऊन आणि परिसरातील शांततेचा भंग करून, धर्माचरण किंवा धर्मप्रसार करण्याचा अधिकार नाही. इतरांचे मूलभूत आणि नागरी हक्क पायदळी तुडविण्याचाही अधिकार नाही.'' कोर्टाने असाही आदेश या खटल्यात दिला आहे की, कोणत्याही धर्मस्थळाने जमिनीपासून आठ फुटांपेक्षा अधिक उंचीवर ध्वनिक्षेपक लावू नये आणि त्याचे तोंड बाहेरच्या बाजूला ठेवू नये. ध्वनिक्षेपक अशा पद्धतीने लावावा की, धर्मस्थळाच्या मध्यभागावर ध्वनी पोहोचावा ज्यायोगे फक्त भक्तांना त्याचा लाभ होईल.''__________________म्हसवडवरून पंढरपूरला गेलो. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या दारातला फ्लेक्सचा बॅनर , मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याबद्दल पंढरपूरच्या आमदारांचे व महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांचे जाहीर आभार मानत विठ्ठलाच्या साक्षीने उभा होता. अधिक मास असल्याने पंढरपूर वारकऱ्यांनी फुलले होते. इंद्रायणीत पाण्यापेक्षा माणसंच जास्त दिसत होती. नदीच्या काठावर बाटलीबंद पिण्याचे पाणी विकणारी दुकानं होती. रेकॉर्डेड टेपच्या माध्यमातून उघड्यावरचं पाणी पिऊन आजारी पडल्यास तुमच्या वारीचा कसा सत्यानाश होईल व बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी कसं चांगलं आहे , याचं महात्म्य कीर्तनाच्या सुरात सांगितलं जात होतं. प्रवासाच्या पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून वारी करणारे वारकरी चौघा-पाच जणांमध्ये मिळून एक बाटली पाणी घेऊन ते पीत होते. ' इठ्ठलाकडं काय मागितलं माऊली ?' सहज जाता जाता एका आजोबांना विचारलं तर आजोबा उत्तरले , ' पाऊस सोडून आता काय मागणार बाबा. आमचं पावसाळं तर संपलं , आता आमच्या पोराढोरांसाठी पिण्यापुरतं पाणी पडू दे एवढंच इठ्ठलाकडं मागणं. ' ..................

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16799390.cms
By Paresh Kale

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !