Some of my facebook status update (Kokanacho Doctor)



These are the excerpts from a well-written series by Dr. Milind Kulkarni titled "Kokanacho Doctor" and appeared in Lokprabha in the year 2012. Dr. Kulkarni practices in one of the village in Sindhudurga district of Maharashtra. He shares his experiences about his patients, partly written in local Malvani language.

Although the theme of the incidences is medical  service however doctor smoothly relates it with psychology of Konkani people, their attitude towards life, impacts of economic condition. He unveils the untouched corner of poor people coming at his dispensary for the medical help. Moreover he explains his relations with the patient which is basic reason why patient feels relaxed and believes his life-saver and shares many personal things with him. Outcome not only help him to understand the human nature but also to help the people in every sense.

The stories coming up are starts on comic note but soon turns so tragic and inspirational. Some bound to make eye-leads wet. I suggest one to read the whole series available online. I am sharing some of them here.
Hats off to Dr. Milind, thank you for such fantastic articles. I expect a book out of this. :-)



"आमच्याकडे सीरिअस पेशंट वाचणार की नाही हे ओळखण्याकरता एक साधी टेस्ट घेतात. माशाचे कालवण जर पेशंटने बाजूला सारले तर लोक पुढच्या तयारीला लागतात आणि दोन घास खाल्ले तर डॉक्टरकडे नेतात........
.........
कोकणी दवाईसुंदरी -- डॉ. मिलिंद कुलकर्णी"





_______________


"एकदा मी टप्प्याटप्प्याने जास्त पॉवरची अँटिबायॉटिक्स देण्याविषयी उदाहरणे देत होतो. ‘‘गे असा बघ, घरात मच्छर इला तर तेका हातान टाळी वाजवून मारता येता आणि बॉम्ब फोडूनही मारता येयत, पण पहिले हातानंच मारता येईल काय ता बघूक होया. म्हणान सेप्ट्रान औषधान आजारपण जाईत काय ता बघूक होया. कशाक उगा भारीची औषधा पहिल्याच खेपेक देऊ?’’
ती माऊली म्हणाली, ‘‘पण भाऊंनो आमच्या हय मच्छर नाय हत.’’ मी डोक्याला हात लावला.

(Ref Lokprabha April 13)"


_______________



मी दोघांनाही तपासलं आणि मुलीला औषध, सुनंदाबाईला डायक्लोफेनॅक इंजेक्शन दिलं आणि शंभर रुपये बिल सांगितलं. 

सुनंदाबाई म्हणाली, ‘‘डॉक्टर पैसे पुढच्या खेपेला येईन तेव्हा देतंय.’’ 

मी अगदीच वैतागलो. बाजारानं पिशवी भरलेली दिसत होती. मी फार वाईट वागलो. म्हणालो, ‘‘आज माका तू कायेक सांगू नको. बाजार करूक तुका पैसे असतत आणि माजा बिल काय लय झाला काय? तू आज असाच जायचा नाय. माका पन्नास रुपये तरी देऊकच हवेत.’’

‘‘भाऊंनो गाडीभाडय़ाक पैसे कमी पडतले."

मी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. पैसे घेतलेच. सुनंदाबाई गेली. ६ वाजता पेशंट संपले. विजयदुर्ग रस्त्याला गाडी सोडली गार वारा लागला. या रस्त्यावर सायंप्रकाशात पिवळ्या फुलांची मखमल सप्टेंबरमध्ये असते ती पाहात होतो आणि सुनंदाबाई मैलाच्या दगडावर हताश बसलेली दिसली.. तिकिटाचे पैसे कमी पडले म्हणून ती ४ मैल चालून पोरीला उचलत, कधी चालवत अशी ती जड पिशवी घेऊन आली होती. नेहमीची गाडी चुकली होती आणि असलेल्या पैशाच्या टप्प्यात बसतिकीट येईपर्यंत ती चालली होती. मला आतून भयानक ढवळून आलं. डोळ्यातल्या पाण्यासकट तिच्या पोरीला उचललं. गाडीत बसवलं.


कसलीही कटुता मनात न ठेवता सुनंदाबाई गाडीत बसली. म्हणाली,
 "भाऊंनो आज पोरीसाठी बूट घेतले त्येनं घोळ झाला. तुमी काय मनाक लावून घेऊ नका."











No comments:

Post a Comment

Thank you for visiting !