slots.us.org चार ओळी तुझ्यासाठी : भावना | The Top Post !

चार ओळी तुझ्यासाठी : भावनाचार ओळी तुझ्यासाठी : भावना 

*

कधीकधी शब्द अपुरे पडतात ,
भावना व्यक्त करताना,
आज भावनाच अपूऱ्या पडल्या 
तुला शुभेच्छा देताना !


*

तुला समोर पाहताच 
मनाची अनेक छकले होतात 
निम्मी माझ्या अन निम्मी तुझ्या बाजूने 
फक्त भांडत सुटतात !

*

तु दिसताच प्रसंगांनी मनात गलका केला 
माझ्यासाठी हा क्षण पुरेसा बोलका होता 
आठवणी आठवणीने विसरताना मात्र 
माझ्या आठवणींना शहारा आला होता !

*

भावनांच्या उद्रेकाने कधीतरी
कवितेचा आधार घ्यावा. 
दाटलेल्या आसवांना रडण्यासाठी ,
थोडा तरी वाव द्यावा !
By Paresh KaleImage Source: http://usaginoyume.deviantart.com/art/You-and-beautiful-world-163019240


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !