slots.us.org स्मरणशक्ती कशी वागते ! | The Top Post !

स्मरणशक्ती कशी वागते !

स्मरणशक्ती कशी वागते !

smoke photographyमाझ्या इंजीनियारिंगच्या सुरुवातीला मी एका  'personality development workshop'  मध्ये भाग घेतला होता. Instructor कुणी फार मोठा management guru वगेरे काही नव्हता.कार्यक्रम interactive स्वरुपाचा असल्याने प्रत्येक जण काहीना काही स्वरूपात सहभागी होत होता. माझा नंबर लागला तो एका प्रातिनिधिक परीक्षणासाठी. मला विचारलेला प्रश्न होता - "तुझ्या सर्वात चांगल्या मित्राचे दुर्गुण आणी गुण सांग !".  मी पटदिशी त्याचे चार दुर्गुण सांगितले आणी गुण मात्र अवघा एक - तोही डोक्याला थोडा ताण दिल्यानंतर. त्याच्यामध्ये अजुनही अनेक गुण होते, जे मला माहीत होते. असं असताना देखील मला ते आठवण्यास वेळ लागला. का? - वरकरणी मला ही  स्मरणशक्तीची व मनुष्यस्वभावाची करामत !(?) वाटली, थोडा शोध घेतल्यावर कळलं की उत्तर वेगळ आहे.


दु:ख उगाळत बसल्याने हाती काहीच लागत नाही. जे चांगलं आहे त्यात समाधान मानावं ही जुनी शिकवण. सुखाचे क्षण आठवावेत, जेणेकरुन मन प्रसन्न राहील , हातून काहीतरी चांगले घडेल. पण गोम इथेच आहे. मनुष्य स्वभावाचे वैशिष्ट्य असे की सुखापेक्षा दु:खाचे प्रसंग, चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी अधिक आठवतात. मनुष्य कितीही चांगला असला तरी गुणगान होण्याएवजी त्याने उधळलेल्या गुणांबद्द्दल चर्चा अधिक.

" We think of memory as a record of our experience. But the idea is not just to store information; it's to store relevant information. [The idea is] to use our experience to guide future behavior ". - Matt Wilson, a professor of neuro-biology at MIT during an interview to TIME magazine.

विल्सन यांच्या म्हणण्यानुसार हि करामत आहे मह्त्वाची वा संबंधाची. जर एखादा महत्त्वाचा प्रसंग, भलेही तो दु:खप्रद  असो, सुखाच्या एखाद्या  प्रसंगापेक्षा तो जास्त प्रभावीपणे लक्षात रहातो. फिरायला गेल्यावर तेथील अद्भुत गोष्ट, उदा. बर्फाचे डोंगर , आपल्या छोट्याश्या मनात घर करून बसतात ते  त्यांच्या भव्यतेमुळे नव्हे तर प्रथम दर्शनामुळे. पहील्या प्रेमाचं देखील असाच होत असणार. प्रथम अनुभुती, मग ती फक्त पहिल्या प्रेमाचीच नव्हे तर पहीला पाउस, पहीली गाडी, पहीला हनिमून, पहिलं मुल, असं बरंच काही !  या यादीत अगदी लहान सहान गोष्टी देखील समाविष्ट असतात त्यांच्या महात्म्यामुळे. ( आजकाल एकाच माणसाची बरीच लग्न होत असल्याने  काही जण 'पाहिलं लग्न' सुद्धा यादीत समाविष्ट करण्याची शक्यता आहे. )

या यादीवरून अजून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे - यादीतील समावेश हा चांगल्या वा वाईटावरुन ठरत नाही. तो ठरतोय फक्त महत्त्वावरुन. आणी म्हणुनच प्रत्येक व्यक्तीची यादी इतरांपेक्षा वेगळी असते. अर्थात यादीमध्ये वाईट गोष्टींचा भरणा जास्त असतो - आयुष्याला कलाटणी देणारया सहसा वाईतच असतात म्हणुन.

या यादी प्रकरणावरुन वरून आठवतात ते दोन अप्रतीम चित्रपट - The Bucket list (2007)  आणी Scent of a Woman (1992). अनुक्रमे जाक निकल्सन व अल पचिनो या दोन महान अभिनेत्यांच्या उत्क्रूष्ट कलाकृती.  मरण्याआधी चांगले क्षण जगणे , अपुऱ्या इच्छा पुर्ण करणे हा या दोन्ही चित्रपटातील समान धागा. मेल्यानंतर जीवन असतं का? हा वादाचा आणि बराचसा श्रद्धेचा भाग. पण जर असं जीवन असलंच तर त्या जीवनात पुर्वायुष्यातील वाईट आठवणी न ठेवता, काहीतरी चांगल्या स्मृती घेऊन जाव्यात अशी जाणीव झाल्यामुळे कदाचीत हे दोघेही आपली यादी संपवण्याच्या मागे लागले असतील.No comments:

Post a Comment

Thank you for visiting !