काही चारोळ्या - 1


काही चारोळ्या  - १

खळी

अवीट मिठीची गोडी
आणीक गालावरली खळी
लाजलीस सखे अशी तू
स्मित ओठी अवखळी !


मेघदूत 

हा सह्याद्री नसता तर
कदाचीत वारे देशावर पोचले असते
या ढगांनी माझे विचार
तुझ्या अंगणी ओतले असते !



हार-जीत 

ही माझी जीत नव्हती, 
ती एक हार होती .
आता ही सवय मोडायची होती,
कारण ही लढाई शेवटची होती !
 

व्यक्त 

केसांच्या बटांना थोडे रुळु दे
गालावरच्या खळीला मग हसू दे !
प्रेमात आपल्या तोच वसंत येऊ दे
जपलेल्या भावनांना ओठी बोलू दे !


शक्य असेल तर …. 

जमलं तर  एवढं करत जा
अधून मधून हसत जा
बाकी कुणाकडे नाही पण ….
निदान माझ्याकडे बघत जा ! 


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !