slots.us.org येईन, नक्की येईन | The Top Post !

येईन, नक्की येईन


Source: http://www.watercolorbypamela.com/images/wp-waiting.jpg

येईन, नक्की येईन !


तुझ्या मनाची आर्त साद ऐकून,
घेतलेल्या प्रत्येक हुंदक्याला प्रतिसाद म्हणून,
स्मरत तू दिलेली शपथ घालुन,
उदास असशील,
आठवणीने  बेचैन होऊन,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


तू एकटीच असशील त्यावेळी,
जेव्हा वाळूत माझं नाव कोरशील,
पदराचा तुला भान नसेल,
मनावारले तरंग पाण्यावर उमटतील,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


वाऱ्याने तुझं केस उडवणं,
मी आल्याचा भास तुला होणं,
मग तुझं हळूच मागे बघणं,
एखादं टिप गाळणं,
हे सर्व झालं की मग,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


माझ्याकडे कदाचित इंद्रधनुष्याचे रंग नसतील,
नसेल एखाद्या सायलीचा सुवास,
चांदण्यांची तर कल्पनाही करवत नाही,
पण नक्की असतील काही स्वप्न,
असेल जीव ओतलेलं,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !
No comments:

Post a Comment

Thank you for visiting !