slots.us.org एडिसनच्या कथा ! | The Top Post !

एडिसनच्या कथा !


एडिसनच्या कथा !एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी त्याला हजार वेळा प्रयोग करावे लागले. प्रत्येक प्रयोगानंतर अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने प्रयत्न चालू ठेवले. त्याचे 'विहित कर्म'.. विद्युत दिवा तयार करणे हे त्याच्या मनात अखंड जिवंत होते. ते प्रयोग करताना त्याला आनंद मिळत होता.

अखेरीस त्याने विद्युत दिवा प्रकाशित केला, तेव्हा त्याला पत्रकारांनी विचारलं, ''एवढय़ा वेळा अपयश येऊनही तुम्ही निराश कसे झाला नाहीत?''

एडिसन म्हणाला, ''ते अपयश नव्हतं. यशाकडे नेणाऱ्या हजार पायऱ्या होत्या. एखादं ध्येय साध्य करताना कामात ९० टक्के परिश्रम असतात आणि दहा टक्के अंत:स्फूर्ती असते.''


वैज्ञानिक थॉमस अ‍ॅल्वा एडिसन यांना ऐकू जरा कमी यायचे. ज्यांना कानांनी कमी ऐकू येतं त्यांची जीभदेखील कमीच चालते.

एक दिवस त्यांचे मित्र त्यांना गमतीने म्हणाले,
तुम्हाला परमेश्वराबद्दल तक्रार असेल ना, कारण त्याने तुम्हाला बुद्धी तर संपूर्ण दिली, पण ऐकण्याची शक्ती मात्र कमी दिली.

तेव्हा एडिसन हसून म्हणाले,
ही तर भगवंताची मोठी कृपा आहे. कारण जर मी दुनियेतील लोकांचंच ऐकत राहिलो असतो तर मी भरकटलो असतो. मी आपल्या अंतरीचा आवाज ऐकला व म्हणूनच मी हे यश मिळवलं.
2 comments:

  1. Very true :) I am always inspired by T.Edison's quote on success and experiments. Nice post :)

    ReplyDelete
    Replies
    1. yes he is an enigmatic personality as you said !

      Delete

Thank you for visiting !