slots.us.org तू | The Top Post !

तू


तू 


दिलेस इतके काही,
मला घेता न आले,
दुःखाआड लपलेले,
सुख ते पाहता न आले.


दोघांचे नाते प्रेमाचे
इतके जड का झाले
माझ्यात हरवले मी
तुला सावरता न आले.


झोकलेस स्वतःला
मी स्तब्ध झाले
तुझ्या आवेगाला
मन समजून न आले


प्रेम करत रहा
शब्द साधे मी दिले
संपतील ही अंतरे
श्वास उमजुन आले. 

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !