slots.us.org पैंजण | The Top Post !

पैंजण


पैंजण


पैंजण घालत नको जाऊ !
मला त्रास होतो. 
जरा काही किणकिणलं की 
मग भास होतो. 

कधीकधी हवेसे वाटतात, 
कारण तू येणार आहेस,
Image Source: Flicker
मला हळूच गाठायचाय,
तू जेव्हा त्यांना बजावतेस !

अधेमधेच वाजतात, 
नको त्या वेळी गडबड करतात,
दोन क्षण कुठे शांततेत जातात, 
तर हे दोघं कुजबुजतात ! 

तरीपण तू पैंजण घालणार, 
माझा जीव कासावीस करणार, 
एखादा नवीन जोड मागणार, 
मला बघून गोड हसणार ! 

म्हणून म्हणतो.....
पैंजण घालताच नको जाऊ !!! 

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !