slots.us.org दुरावा | The Top Post !

दुरावादुरावा


त्या रात्री जी हरवलीस तू ,
तिलाच शोधतो आहे.
मिठीत विसावली होतीस तू,
ती मिठी भोगतो आहे !


मंद धुंद क्षण, जे दुरावले,
पुन्हा ते शोधतो आहे.
विश्वास पूर्ण आहे तुजवरी,
परीस्थिती भोगतो आहे !


आहे नक्की, परतशील तू ,
तो क्षण मी शोधतो आहे.
असेल वाईट तरीही, उद्यासाठी
हा विरह भोगतो आहे !


देईल आधार जिवनाला,
ती सखी शोधतो आहे.
जगात आहे कुणीतरी माझे,
हा आनंद भोगतो आहे !


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !