slots.us.org विश्वास | The Top Post !

विश्वास


विश्वास

पुन्हा दारू पिऊन घरी आलाय
माहित नाही कसला राग धरलाय

वाटतंय मला मारेल
मुलांना उगाच झोडपेल

तसा तो बऱ्याचदा पिऊन येतो
आल्यावर गप्प झोपतो

सकाळी उठुन तेच रडगाणे
आज तरी मिळतील का काही आणे?

दिवसामागून दिवस ढकलतोय ,
कसा का होईना जगतोय

उद्याची चिंता हवीच कशाला?
दोन घास नक्की मिळतील जेवायला

आज मात्र अवतारच वेगळा आहे
कुठेतरी वणवा नक्कीच पेटलाय

आज तर उपासही नाहीयेय
मग नियतीनं असा कोणता डाव उधळलाय?No comments:

Post a Comment

Thank you for visiting !