Pages

अर्थ क्रान्ति


अर्थ क्रान्ति


अमेरिकेतल्या मंदी पुढे निदान अजुन तरी भारतीय अर्थव्यवस्था तग धरून आहे. याला भारतीय माणसाची बचत करण्याची मानसिकता , सोन्याची असलेली आवड , रिजर्व बँकेच्या योजना इत्यादि कारण देता येतील. हे चित्र खुप चांगले आहे हे निश्चितच. पण ज्यावेळेस आपण महासत्ता होण्याचा विचार करतो तेव्हा हे चित्र अपूर्ण आहे अस मला वाटत.

अजुनही आपण परदेशी गुन्तवणुकीवर अवलंबून आहे. परिणामी इतर प्रगत देशामधील मंदीची झळ आपल्यालाही पोहोचते. विकास दर घटतो, बेकारी वाढते. अशा अवस्थेत आपण अशी काही पावले उचलू शकतो का जेणेकरून आपण आर्थिक बाबतीतही बरयापैकी स्वावलंबी होऊ?

एक उदाहरण आपल्या चंद्र मोहिमेचे वा अणु कार्यक्रमाचे घेता येइल. आपण अणुस्फ़ोट केला तेव्हा सर्व प्रगत देशानी विरोध केला व असहकार पुकारला. अंतराळ सन्शोधनातहि आपल्याला फारशी कुणाची मदत नव्हती ( जी काही मदत होती ती जागतिक राज कारणा खाली होती ). इसरो, टी आय एफ आर सारख्या संस्था उभारून आपण या बाबतीत स्वतंत्र झालो. असाच काही अर्थ व्यवस्थे मधे करता येइल का? अर्थकारण , समाज कारण यांचा मेळ किती आहे हे नव्याने सांगायला नको. या दोघानाही एकत्र बळकट करण्याचे प्रयत्न करता येतील का?

शक्य आहे ... यावर एक "अर्थ" पूर्ण लेख वाचनात आला.

"अर्थ क्रान्ति "

http://www.arthakranti.org/index.htm

अनिल बोकिलानी सुरु केलेली चळवळ उल्लेखनीय आहे. या वेब साईट वर आपल्याला त्यानी मांडलेले अभ्यास पूर्ण विचार वाचायला मिळतील. विविध प्रेझेंटेशन , लेख, आकृति  याने  परिपूर्ण व सोप्या शब्दात मांडणी , विषयाची सखोल चर्चा... आणखी काही लिहित नाही ...वाचा विचार करा व कृति करा ...


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !