Pages

पाण्याचा एक थेंब



बरयाच दिवसानी पडलेला पाण्याचा एक थेंब
कावळ्याने चोचीत पकडला
एक तर एक, निदान तेवढा तरी मिळाला

ही धरणे , पाणी साठवण्यासाठी नाहीतच
ती साठवतात ठेकेदाराचा काळा पैसा,
करादात्यांचा पांढरा पैसा,
सामान्य माणसाची स्वप्न,
नेत्यांची आश्वासन,
मजुरांचे कष्ट,
गरीब शेतकरयाचे अश्रू
श्रीमंत शेतकरयाचा माजोरडेपणा,
आणि अगदीच बघायला गेल तर
नदीने वाहून आणलेला प्रचंड गाळ !

धरण !
कुणाला देतात चार दिवसाची स्वप्न
तर कुणाला आयुष्य भराची आशा
काही बोक्याना खुप लोणी मिळत
मग इतर चोरांच्या पोटात दुखत

कधी काळी ज्या लोकाना गावाच्या पाणवठ्यावरून हाकलल
अशानीच या धरणावर काम कल
मग ते आपोआप निघून गेले
आजुबाजुच्याना "समाजसेवकानी" हाकलल
" घर पाठीवर घेउन फिरा " अस सांगीतल
(तरच आम्हाला सुखाची झोप मिळेल !)

यावर्षी थोड पाणी पावसान भरल ,
थोड विमानाने पाड़ल
तुमच आमच असाही खुप झाल
आन्दोलन केली झगडा केला
कोर्टात जाउन का होईना
प्रत्येक थेंब नीट वाटुन घेतला
एक तर एक, निदान तेवढा तरी मिळाला


Read my more poems here.

By Paresh Kale

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !