Pages

सखी तु अशी कशी ?



भेटावयास येता संध्या समयी
कनक चम्पेची माळ गुंफिशी
सुवास घेता तुझ्या केश संभारी
लटी नजर तुझी चोरशी
सखी तु अशी कशी ?

माझा वेडेपणा ज्ञात मजला
करता बावचळलीस का जराशी
गालावरली लाली कशी फुलली
फक्त दोघ संध्यापाखर आकाशी
सखी तु अशी कशी ?

उलटून सांज गेली घरावरी
इतक्यात का माघारी जाशी
नुकतेच चांदणे हे उमललेले
मिलनाची धुंद रात्र बाकी
सखी तु अशी कशी ?

उद्या पुन्हा भेटशील का वाटेवर
येताना निघ लवकर जराशी
काढू नको रात्र तळमळत ही

स्वप्नातून असेन मी तुझपाशी
सखी तु अशी कशी ?

Read my more poems here.



No comments:

Post a Comment

Thank you for visiting !