Pages

My Facebook updates (Sports)


My Facebook updates (Sports)




"रिकी पाँटिंग निवृत्त झाला म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचा बहारदार कव्हर ड्राइव्ह आता बघायला मिळणार नाही . एक खडूस कर्णधार आपल्याला दिसणार नाही . प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच असतो , अशा निर्धाराने कोणत्याही मैदानावर पाय ठेवणारा जिद्दी क्रिकेटपटू दिसणार नाही .
संघातील मातबर खेळाडू निवृत्त झाल्यानंतर आपल्या नवथर पण गुणी सहकाऱ्यांच्या खेळाला आकार देणारा नेता दिसणार नाही . प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी मानसिक दडपणाचे ' खेळ ' करणारा धुरंधर दिसणार नाही . धावांचा अखंड रतीब घालणारा फलंदाज दिसणार नाही ."




_______________

"एका चिमुरडय़ाने विचारले, ‘तुझे पार्टनर सेहवाग, सचिन, गांगुली, ढोणी असतात तेव्हा ते धडाधड फटके मारून धावा काढतात. तू मात्र हळू हळू खेळत राहतोस. तुझ्यावर दडपण येत नाही?’
राहुलने पटकन उत्तर दिले, ‘‘दडपण कसे येईल? ते माझ्याशी प्रतिस्पर्धी म्हणून खेळत नाहीत. पार्टनर म्हणून खेळत असतात. त्यांनी मारलेल्या प्रत्येक फटक्याचा तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. कारण मी कर्णधार आहे. प्रत्येक फटक्याने आमच्या धावसंख्येत भर पडते. आमच्या डावपेचांप्रमाणे ते जे उत्तम करतात ते त्यांनी करायचे असते.
आणि मी जे उत्तम करू शकतो ते मी करायचे असते. हे सगळे ड्रेसिंगरूममध्ये ठरते.’’"


_________________



" exhilarating Editorial : ‘मद्रासचा वाघ’
युरोपमधील दुस्वास त्याला नवा नव्हता. २०१०मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे युरोपातील विमानसेवा अस्ताव्यस्त झाल्याने सामना थोडा पुढे ढकलावा अशी विनंती आनंदने केली होती, पण बल्गेरियाने ती फेटाळली. तक्रार न करता आनंदने स्पेनहून तीन हजार किलोमीटर्सचा बर्फातील मोटार प्रवास करून सामन्याची वेळ गाठली आणि विजेतेपदही राखले.
खेळ म्हणजे उन्माद असे समीकरण सध्या आयपीएल व फुटबॉलमुळे रूढ होत असताना खेळातील बौद्धिक कुशलतेचा सात्त्विक तरीही राजेशाही आनंद मद्रासच्या वाघाने मिळवून दिला. बुद्धिबळाच्या जगात विश्वनाथन आनंद हा ‘मद्रासचा वाघ’ म्हणून ओळखला जातो. खेळाबरोबरच वागण्या-बोलण्यातून विश्वनाथनने ही उपमा सार्थ ठरविली.

आत्मविश्वास हा आनंदचा सर्वात मोठा गुण. या आत्मविश्वासाला व्यक्तिगत तसा सामाजिक पैलूही आहे. भारतात या आत्मविश्वासाचे बीजारोपण झाले ते ८०च्या दशकात. भारताचा आत्मविश्वास वेगवेगळ्या मार्गाने प्रगट होऊ लागला. पराभूत मनोवृत्ती मागे टाकून आपल्यातील गुणांचे सर्वोच्च प्रदर्शन करण्याची ईर्षां दिसू लागली. क्रिकेटमध्ये याची मुहूर्तमेढ सुनील गावस्करने केली. वेस्ट इंडिजच्या तुफानी माऱ्यासमोर शिरस्त्राण न घालता ठामपणे उभा राहणारा लिटल मास्टर ही आत्मविश्वासाची सुरुवात होती. त्यापासून प्रेरणा घेत कपिलच्या टीमने विश्वचषकाचा कळस चढविला. संथ, आळशी समजले जाणारे भारतीय वेगवान, आक्रमक खेळ खेळू शकतात हे कपिलने दाखवून दिले.

Read more here : http://tinyurl.com/7mng8p9 Loksatta Marathi Daily

By Paresh Kale
Read more facebook updates here.











No comments:

Post a Comment

Thank you for visiting !