चार ओळी तुझ्यासाठी : भुरभूरणारे केस
मला सारखं बजावातेस तू,
केसांना हात नको लावू 
हेच वाऱ्याने केल्यावर मात्र 
म्हणतेस "आता मी काय करू ?"
तुझ्या भुरभुरणाऱ्या केसांचं 
खरं गुपीत आज मला कळलं होतं !
दिवसालासुद्धा रात्र करता येण्याजोगं 
सामर्थ्य त्यात दडलं होतं !
*****
तुझी आतुरतेने वाट पहात असतानाच
दार हळुच ढकललं गेलं होतं,
एरव्ही तुझे केस उडवणाऱ्या झुळुकेनं,
आज मला धारेवर धरलं होतं !
By Paresh Kale

No comments:
Post a Comment
Thank you for visiting !