Pages

बोलु कवतिकें - अविनाश बिनीवाले (Book review)

बोलु कवतिकें - अविनाश बिनीवाले (Book review)

प्रश्न आणि प्रश्न 

88
रु. 70
2005
इंग्रजी भाषा का व कशी शिकायची? नुसते शब्द पाठ केले की उत्तम बोलता येते का? योग्य व्याकरण वापरायला व बरोबर  उच्चार कुठून शिकावेत? असे नि अनेक प्रश्न मुख्यत: एका मराठी (आणी कोणत्याही अ-इंग्रजी) भाषिकाच्या मनात येत असतात. 

मराठी शाळांमधले इंग्रजी शिक्षण , बाह्य जगातले इंग्रजीचे वाढते प्रस्थ व प्रभाव, राजकारणी करत असलेला मराठी अस्मितेचा दुरुपयोग, इत्यादी इत्यादी मुद्यांमुळे गोंधळात अधिकच भर पडते. अगदी अशिक्षित पालकही केवळ अनुकरण करतात जे बऱ्याचदा फ़सत.  अशा स्थितीत योग्य मार्गदर्शन करणारी व वरील उल्लेखलेला गोंधळ कमी करणारी जी फार कमी पुस्तकं  मराठीत उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे अविनाश बिनीवाले यांचं - बोलु कवतिकें. बिनीवाले अनेक भाषेत तरबेज आहेतच पण या लेखकाचं व परिणामी या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे - 

  • सहज सोपं लेखन : सामान्यपणे क्लिष्ट वाटणारे मुद्दे अतिशय सोप्या पद्धतीने आणि मनोरंजक पद्धतीने समजावून दिले आहेत. त्याचबरोबर अनेक दाखले व उदाहरणे देऊन बारकावे समजवुन देण्याचा लेखकाचा हातखंडा !
  • व्यासंग - विविध भाषा , त्यांचा विकास या तांत्रिक गोष्टींचा मेळ संस्कृती , भूगोल , इतिहास या विषयांशी घातल्याने माहिती रंजक आहे. उदा. "खालच्या जातींची भाषा 'लो-जर्मन' - ज्यामध्ये लो या शब्दाचा संबंध जातीशी नसून तिथल्या सखल प्रदेशाशी आहे. "व" हे अक्षर आपण 'नि' या शब्दास समानार्थी म्हणून वापरतो, पण तो आहे म्लेंछ. 
  • इंग्रजी कशी शिकावी - वेळोवेळी या बाबतीत लेखक बहुमुल्य मार्गदर्शन करतो. नक्की काय करावे, काय करू नये, गैर समाज सोडवणे (उदा. शब्द पाठ करणे , इंग्रजी चा वापर) अशामुळे वाचकाला बहुमुल्य मदत होते. 


200
रु. 130
2004

पुस्तकातील काही मजेदार व नवीन माहिती : 

  • इंग्रजी मधे शब्दाच्या सुरुवातीला क, ट किंवा प असेल तर त्यांचा उच्चार अनुक्रमे ख, ठ आणि फ असा होतो. 
  • भारतीय वंशाच्या नसलेल्या ब्रहमी , तिबेटी, कंपुची ई. भाषा ह्या ब्राह्मी लिपीवरून विकसीत लिप्या ज्यात  अ,आ, … क, ख, ग  असाच क्रम असलेल्या लिप्या वापरतात. 
  • Kaamat व Kaamath हे भिन्न भाषिक व भिन्न प्रदेशातील देखील !
  • कन्नड भाषेत मराठीतल्या 'भाऊ' व 'बहीण' ह्या शब्दांना प्रतिशब्दच नाहीत.  

या पुस्तकाखेरीज श्री. आपटे यांची पुस्तकमालिका - अशी ही  इंग्रजी ! राजहंस प्रकाशन (Rajahans Prakashan) ने प्रकाशीत केलेलं हे पुस्तक वेगळ्या धाटणीचं आहे - एका लेखात चार शब्द , त्याचे अर्थ, उपयोग , निगडित बातम्या व इतर माहिती - असल्याने निरास वाटत नाही. 




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !