भावनांचा फुलोरा शब्दांचा धुमारा, काळाच्या गर्दीत मनाचा पसारा. जपताना त्या आठवणी, चार ओळी तुझ्यासाठी !
Pages
▼
त्रयस्थ
त्रयस्थ
मंतरलेल्या चैत्रबनात,
कुणीतरी हाक मारतंय तुला !
वैशाख वणव्यात,
कुणीतरी आठवतंय तुला !
नेहमीच आहे तुझ्यासाठी तो,
http://www.salmagundi.org/auctions/a-4/large/177.jpg |
सावरायला तत्पर आहे,
खुळे कातर मन!
सार्थ आहे विश्वास तुझा,
सुंदर हे जीवन !
मैत्रीच्या सड्यात खुलत जातं,
तेच खरं मीलन!
वाट बिकट खरी,
तो जवळ असेल !
प्रत्येक क्षण उधळत,
रंग तो भरेल !
पावलागणिक परिक्षा असतील,
कबुल, तुला धीर हवा !
लवकरच त्याची हो,
बहुतेक त्याला वेळ नसावा!
कळी
कळी
https://s-media-cache-ak0.pinimg.com/ |
म्हणता म्हणता कळी दवाला बिलगली
अबोल बिचारी खुपसे बोलुन गेली
प्रियकराच्या प्रेमात न्हाऊन गेली
रेशमी किरण स्पर्शून अंग गेले
कळीचे उमलुन फुल झाले
दव हरवुन कुठे हवेत गेला
कोमेजल्यावर ती का परतला?
नाहीस आता तू , म्हणुनी रडला,
नव्या कळ्यांना भिजवुनी गेला.
अवधी
अवधी
का लिहितेस माझे नाव वाळुमधे,
पुसुन टाकतील लगेच त्या लाटा,
कोर नाव पलीकडल्या दगडांमध्ये,
झिजण्यास तपांचा वेळ हवा !
का ठेवतेस फुल सांभाळुन,
उदया नसेल सुगंध त्याचा,
लाव एक वेल रातराणीची,
प्रत्येक रात्रीस सुगंध माझा !
का बघतेस रंगधनु कडे,
विरतील हवेत रंग त्याचे,
भरून घे रंग प्रेमाचे,
उधळत जा हास्य जीवनाचे !
Image: http://myfavoriteflower.com/wp-content/uploads/2014/07/Daydreams.jpg