Pages

शब्दकथा

 

शब्द येऊन सांगतात आत्मकथा 

माझे काम फक्त लिहिण्या पुरते 

सत्य - कलेचा संबंध योगायोगाचा 

मी जाणतो हे वाक्य बोलण्यापुरते 


होतात रिते वाहावून भावना 

कळत नाही कधी हि रात्र सरते 

म्हणतात नवी पहाट नवी आशा 

मी जाणतो हे नाटक दिवसापुरते 


एखाद दिवशी होतात अबोल 

अश्रुंशिवाय काही न स्फुटते 

काय म्हणावे मला कळत नाही 

मी जाणतो हे भाव शब्दांपलीकडले


येता उबग यमक जोडण्याचा

भाषा मग मरणाची चालते 

वेळ येते तुझ्या निरोपाची

मी जाणतो हे विचार बरे नव्हे




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !