Pages

कालचक्र

दिवस सरला झाली रात्र

अनंत फिरते हे कालचक्र

अंधाराच्या कुशीत उगवे

हळूच प्रणय राज sudhakar


वसंत जाऊनी ग्रीष्म आला

सोनफुलांनी बहावा सजला

हरेक झुबका उधळे रंग पिवळा

पर्णहीन वृक्षाने हरवला हिरवा


भेट प्रिये त्या झाडाखाली 

पुष्पवर्षाव वाट पाहे तुझी

बैस शेजारी कुसुम शय्येवरी

दोघ करू गुजगोष्टी रात्र सारी


मंद हवा स्पर्शानी भारावली

जादू तुझी की या चांदण्याची

वाटे संपूच नये हा बहर कधी

थांबेल का ही वेळ थोडीतरी


तू जाशील निघुन भल्यापहाटे

भेट आजची, झाले स्वप्न खरे

ऋतू मिलनाचा समीप आहे

अशी चोरून भेट शेवटची बरे !

                                              


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !