भावनांचा फुलोरा शब्दांचा धुमारा, काळाच्या गर्दीत मनाचा पसारा. जपताना त्या आठवणी, चार ओळी तुझ्यासाठी !
रात्रीस भेदतो अनोळखा प्रकाश मंद तेवणारी तु नंदादीपाची वात
किनारा सांगतो वेडावूनी आकाश फेसाळणारी तू माझी बेफाम लाट
स्पर्श भासतो कातावल्या मनास सोबतीस जणू मोरपिसाची गाज
भेटी असंख्य तरी संपेना ही आस राहतेस ओठांशी तू भैरवीची पहाट