सहजच
कधीतरी माझीही काळजी करशील?
गरज नाही तरीही.
अशीच का होईना, बघून हसशील?
थोडीच का होईना, नजर जोडशील?
उगीच का होईना, जराशी चीडशील ?
काळजी घे थोडीशी, सहज रागावशील?
तशी गरज नाही तरीही.
काल चांदण्यात फिरताना आठवलीस,
तशी गरज नाही तरीही.
जाऊ दूरवर कुठेतरी, फिरायला येशील?
मागितला नाही कधी, आज हात देशील?
अमुल्य आहे, मलाही थोडा वेळ देशील?
गूढ तारकांसाठी, एखादा क्षण घालवशील?
तशी गरज नाही तरीही.…।