इच्छा


इच्छा  

माझी  कविता  तशी गुणगुणण्यासारखी !
आज तुला का म्हणायचीय ?
शब्दांमधल्या दडलेल्या अर्थाला ,
का वेगळाच सुर लावायचाय ?

अर्थ नाही खिशात माझ्या ,
पण अर्थहीन उधळले नाही ,
शब्द जपुन वापरलेत मी 
त्याची किंमत मोजतोय अशी !

ऐकायला मी नसणारे ,
हे गीत गाणारेस कुणासाठी ?
दोघं बसले असताना ,
एकांतात दूरच्या तळ्याकाठी !

गाण्याची सवय लावु नकोस ,
एकांतात कदाचित मी आठवेन ,
अंगा अंगाला होणाऱ्या स्पर्शात ,
फक्त मी आणि मीच असेन !

सर्व काही विसरून जा ,
माझे नवे गित घेऊन जा ,
आनंदाने जगण्यासाठी ,
ही एकतरी भेट ठेवुन जा!  





No comments:

Post a Comment

Thank you for visiting !