slots.us.org सवय | The Top Post !

सवय


सवयतुला ही सवय कधीपासून लागली ?
म्हणजे …
नदीतल्या संथ पाण्यात पाय बुडवून बसण्याची !

तू पाय बुडवल्यावर,
पाण्यावर जे तरंग उमटतात ना
ते तरंग नाहीतच मुळी
त्या संथ पाण्यावर
ते उठलेलं ते रोमांच आहे.
तुझा नाजुकशा स्पर्शाने
त्या पाण्यालाही झालेली
तारुण्याची जाण  आहे.


तुझ्या पायांची हालचाल पाहून
मासेही कसे स्तब्ध झालेत !
जणु आपलं पोहणच विसरलेत.
आश्चर्य वाटतय त्यांना
अशा डौलदार हालचाली
आपणसुद्धा नाही करू शकत!

नदीकाठची फुलं,
आपला अस्तित्वच विसरलीयत.
कारण, तू तिथं  बसलीयस !
कोवळ्या उन्हात भिजणाऱ्या तुला बघून
त्यांची शुद्ध हरपलीय !बेभान मी ही झालोय….
म्हणून तर आज पुन्हा आलोय !
तुझी वाट बघतोय,
थोडीशी स्वप्नही रंगवतोय.

पण आधी मला सांग
तुला हि सवय लागली कधीपासून ?

All Images from : Google Images

2 comments:

  1. क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!

    ReplyDelete

Thank you for visiting !