Showing posts with label स्वप्न. Show all posts
Showing posts with label स्वप्न. Show all posts

संध्याकाळ


संध्याकाळ


आज आपण  भेटू तिथे
आकाश मिळे धरेला जिथे !

समईची ज्योत विझावी,
स्पर्श मुक्त व्हावे,
ओठांनी काही बोलावे,
गालांनी काही ऐकावे.

रिकाम्या ओंजळीत तू
थोडेसे प्रेम मागावे
तव प्रेम करावे इतके,
ओंजळीत चांदणे दयावे.

सुरु होतील सरी पावसाच्या
बरसतील थोडे मोती,
वेचुन घे त्यातले काही,
आज डोळ्यांना झोप नाही.



हार-जीत

हार-जीत

ही माझी जीत नव्हती,
ही एक हार होती .
आता ही सवय मोडायची होती ,
कारण ही लढाई शेवटची होती !


शक्य असेल तर ....


शक्य असेल तर .....

जमलं तर एवढं करत जा,
अधुन मधुन हसत जा,
बाकी कुणाकडे नाही पण,
निदान माझ्याकडे बघत जा !


येईन, नक्की येईन


Source: http://www.watercolorbypamela.com/images/wp-waiting.jpg

येईन, नक्की येईन !


तुझ्या मनाची आर्त साद ऐकून,
घेतलेल्या प्रत्येक हुंदक्याला प्रतिसाद म्हणून,
स्मरत तू दिलेली शपथ घालुन,
उदास असशील,
आठवणीने  बेचैन होऊन,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


तू एकटीच असशील त्यावेळी,
जेव्हा वाळूत माझं नाव कोरशील,
पदराचा तुला भान नसेल,
मनावारले तरंग पाण्यावर उमटतील,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


वाऱ्याने तुझं केस उडवणं,
मी आल्याचा भास तुला होणं,
मग तुझं हळूच मागे बघणं,
एखादं टिप गाळणं,
हे सर्व झालं की मग,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !


माझ्याकडे कदाचित इंद्रधनुष्याचे रंग नसतील,
नसेल एखाद्या सायलीचा सुवास,
चांदण्यांची तर कल्पनाही करवत नाही,
पण नक्की असतील काही स्वप्न,
असेल जीव ओतलेलं,
तेव्हा …. मी येईन, नक्की येईन !




स्वप्न


Source: http://mikeprout.com

स्वप्न


आज हळूच सखे
येशील का स्वप्नात तू ?
गोड गुलाबी गाली
सखे हसशील का तू?

नुसतेच स्वप्न नसावे
स्वप्नात सत्य भासावे
वेडा पीसा मजला पाहून
धुंदीच्या कुशीत तू शिरून
सखे थोडी लाजशील का तू?

नि:शब्द नको
स्वप्न बोलके असुदे
निलच:क्षुचे
मला अमृत पिउ दे
सखे थोडी बोलशील का तू?