अनुभूती


रात्रीस भेदतो अनोळखा प्रकाश
मंद तेवणारी तु नंदादीपाची वात

किनारा सांगतो वेडावूनी आकाश
फेसाळणारी तू माझी बेफाम लाट

स्पर्श भासतो  कातावल्या मनास
सोबतीस जणू मोरपिसाची गाज

भेटी असंख्य तरी संपेना ही आस
राहतेस ओठांशी तू भैरवीची पहाट