Showing posts with label girlfriend. Show all posts
Showing posts with label girlfriend. Show all posts

ओल्या केसानिशी

अशीच ये समोरी ओल्या केसानिशी
मागितले काही तर म्हणू नको नाही

झाकला चेहरा कशाला या बटानी
तरीच चांदणे अजून पडलेच नाही

पहात रहावे आर्जव डोळ्यातले मी
मिठीत घेण्याचेही आज भान नाही

येतेस जवळ काळसुद्धा स्तब्ध होतो
शब्दांना बोलणे कसे ठाउक नाही

ओलेता स्पर्श जाणवतो ओठांना
जागेपणी कधी असे घडलेच नाही

आठवता तू नेहमी का हरवून जातो 
वेंधळ्या मना स्वप्नी मी पाठवत नाही










जीवन मला लाभले


केले आहे प्रेम मी, देऊ किती दाखले 
ऐश्वर्य कुबेराचे, आज मला लाभले. 

न बोलता न सांगता, तुझीच मी झाले 
संपले दुःख तेही, सुख मला लाभले. 

नसशी जवळ तु, काही आठवले 
एकटे पण गोड, विरह मला लाभले. 

त्या कोवळ्या फुलांचे, स्पर्श सांगून गेले. 
मनात काही शोधता, ते क्षण मला लाभले 

न राहवून मी, आरशात पाहिले 
हरवलेले कधीचे, हास्य मला लाभले. 

भेटता तु वाटेवर, श्वास एक झाले 
उमलत्या आशेत, जीवन मला लाभले.


                                





घड़ी

मेरे दिलकी दुआ आज कौनसा रंग लायी है

दहलीज पार कर आज गझल घर आयी है | 


शमा बुझाओ, उसे जलने की जरुरत नहीं है 

रोशनीसे महकाने, आज नजम घर आयी है | 


अनगिनत तसव्वुर ख़यालोमे बेझिझक है

तू सामने है, तो दिमागने सोच क्यों खोयी है?


कुछ बाते करू या बस ये नूर देखता रहु मैं 

तेरे लबोने इन लब्जोंको ख़ामोशी सिखायी है | 


निगाह मिलाना चाहता हु, आँखे क्यों झुकी है 

चाँद ढकने कम्बख्त, अकेली झुल्फ आयी है !


रफ़्तार बहके इसकी, समय बड़ा बेईमान है 

ठहर थोड़ा, इश्क़के इम्तिहांकी घड़ी आयी है | 


अपने दरमियाँ के ये फासले ख़त्म क्यों नहीं होते 

मजबूर हालात तोड़ने ये मुनासिब घडी आयी है | 


बहकने दे 'अकाब' मुझे रोकना नामुमकिन है 

इन सवालोंसे, जवाब माँगने की बारी आयी है | 

                                                         





सुधाकर

सर्व काही असून  सुद्धा 

तुजविन चित्र अपूर्ण आहे

सर्व काही नसूनही तू

असशील तर संपूर्ण आहे


जागेपणी तुझे आभास

कल्पना स्वप्न नोहे

खोट्याविना खऱ्याची

किंमत अपूर्ण आहे


हिंदोळ्यावर हुंदके

छाती दडपली आहे

लटक्या भांडणाविना

संवाद अपूर्ण आहे


गुंतवशील कसे मला

शब्द शब्द मूक आहे

मिठीशिवाय माझ्या

तुझा राग अपुर्ण आहे


रात्र पहाटेला मिळे

सुधाकर मावळूदे

भेट तुझी नी माझी 

अथवा अपूर्ण आहे


निघतेस मात्र जेव्हा

थांबवु तुला कसे

वेळ विचित्र आहे

काळ अपूर्ण आहे

                                 

  





Hamnashini



रुक जाता था हर बार,
एक मुलाकात के लिये
और वो मुडके देखे नही कभी !

थम जाता था हर बार,
उनका चेहरा देखने
और वो पर्दा उठाये नही कभी !

इरादा था मैं डुब जाऊ,
चाह-ए-जकन में तेरी
देख हमेवो मुस्कुराए नही कभी !

तरस रहा मुद्दत से,
कुछ तो कहिये हमसे
और वो लब खोले नही कभी  !

चाहता था छू लू उन्हें,
बजे दिलमे अबरेशम
कमबख्त मौका मिला नही कभी !

हो अगर पत्थर दिल तुम,
तो संग तराश हम भी है
और जिद हम छोड़े नही कभी !

जिसम की बात न थी,
मैं ढूंढ हमनशिनी रहा
और दुआ कबुल हुई नही कभी !




 

इश्के दी चाशनी


कभी कभी मुझे तुम जलेबी की तरह लगती हो

चाश्नी में डूबी हुई सी, जब मुझसे बाते करती हो

हम मरकज़ चक्कर काटती हुई मेरे इर्द गिर्द (concentric)

मरोडनेपे जिसको, दिल से मानो प्यार बहता हो


तुम काजुकतली होने की संभावना ज्यादा है

वही एक है जो तुमसे सादगी सीखी है

उसकी दुनिया चाहे कितनीही गोलमटोल हो

लेकिन मेरे लिए त्रिकोनी हिरे जैसी है 


खीर होती है थोड़ी पतली थोड़ी गाढ़ी

ठीक वैसेही मिजाज जब तुम मुझे डाटती हो

मैं बस देखता हूं तेरी आँखोंको और सोचता हूं

केसर की तरह घुल जाऊ इस फिरनी में


बहुत कम देखा है तुम्हे शरमाते हुए

जब भी शरमाती हो, हाथोंसे चेहरा छुपाके

जैसे गुजिया के अंदर गुड़ का हो पूरण

और मेरे लब्ज घी का काम करते रहे ।


कभी मेरे लिए हो सोनपापड़ी 

तो कभी हो रंगबिरंगी बर्फी

या कहु रसभरी रसमलाई

या कहु मीठी ठंडी रबड़ी


नाम कई है तेरे दुनिया के लिए


मेरे लिए हो बस .....

इश्के दी चाशनी ।

                                       


मिलीभगत



हर रोज सुबह

मुझे बिना पुछे

वो सुरज की किरने

तुम्हे कैसे लिपट जाती है?

और गौरतलब है

तुम क्या खिल जाती हो।


कुछ उसी तरह

नहाने के बाद

वो पानी की बुंदे

तुम्हे नही छोडती

खैर कोई बात नही

गिले बाल मेरी कमजोरी है।


हवाओंको तो बस

चाहीये होता है बहाना

तुम्हारे साथ रहे

और करे मस्तीया

शायद वही तुम्हारी

हसी खिलाई रहती है 


तुम्हे बिलकुल पता नही

रात की चादर ओढे 

जब सो जाती हो

उस मासुम चेहरेके

भाव निहारने के लिये

मै रातभर जागता हू ।


और पता नही

इस सृष्टीके कितने

अनजान अनगिनत

तत्व तुम्हे आजभी

तराशे जा रहे है

शायद तुमसे अभी तक

खुदाका मन भरा नही।



दुरावा



दुरावा 


या तरुतळी
एकलीच मी
हात दे सख्या रे
घायाळ मी हरिणी

पाहते वाट तुझी
आज तरी येशील तू
अवस्था गूढ माझी
कान शीळ देशील तु

विरले आभाळ सारे
भिजवुनी सरला दिवस
पाय घरला परतले
रात्र पुन्हा एक अमावास

मोजीत तारे
रात्र चालली
चंद्राच्या प्रकाशात
रातराणी फुलली
नाही मला काय त्याचे
डोळ्यांनी रात जागली

आयुष्य असे क्षणभंगुर
लावु दे भैरवीचा सुर
मिटवून टाक अंतरे
आज तरी ये बरे!

येशील स्वप्नात तू
इतुके मज ठाव आहे.
अभागी नशीब आहे
डोळ्यात मात्र जाग आहे.






मै शायर तो नहीं , मगर...


मै शायर तो नहीं , मगर...  



यादों ने पूछा, क्या उनसे मिल आऊ ?

मैं चूप रहा ।

पुराने पुल कबके गिर गये होंगे !
तुमसे कही हर बात शायरी होती थी,

आजकल लब्ज ढुंढनेमेही वक्त निकल जाता है !
ना जाने क्यों बादल बेमौसम बरस रहे है ।

उन लमहोंको तो मैने बस याद किया था ।


मेरी जिंदगी एक किताब है। इल्म नही वक्त का, 

कब पन्ना पलट दे।
अरे व बडे बडे मंदिर मस्जिद बनानेवाले,

सुना है खुदा दिलमे भी रह लेता है. 

मगर दिल बडा चाहिये.



दुरावा



दुरावा


त्या रात्री जी हरवलीस तू ,
तिलाच शोधतो आहे.
मिठीत विसावली होतीस तू,
ती मिठी भोगतो आहे !


मंद धुंद क्षण, जे दुरावले,
पुन्हा ते शोधतो आहे.
विश्वास पूर्ण आहे तुजवरी,
परीस्थिती भोगतो आहे !


आहे नक्की, परतशील तू ,
तो क्षण मी शोधतो आहे.
असेल वाईट तरीही, उद्यासाठी
हा विरह भोगतो आहे !


देईल आधार जिवनाला,
ती सखी शोधतो आहे.
जगात आहे कुणीतरी माझे,
हा आनंद भोगतो आहे !


सवय


सवय

तुला ही सवय कधीपासून लागली,
नदीतल्या संथ पाण्यात पाय बुडवुन बसण्याची?

तू पाय बुडवल्यावर,
पाण्यावर जे तरंग उमटतात ना
ते तरंग नाहीतच मुळी !
संथ पाण्यावर
ते उठलेले रोमांच आहेत
तुझ्या नाजूक स्पर्शाने
पाण्यालाही झालेली
तारुण्याची जाण आहे !

तुझ्या पायांची हालचाल पाहून,
मासेही कसे स्तब्ध झालेत.
जणू आपलं पोहोणच विसरलेत !
आश्चर्य वाटतंय त्यांना,
अशी डौलदार हालचाल
आपणही नाही करु शकत !

नदीकाठची फुलं आपलं अस्तित्वच विसरलीयत,
कारण तू तिथं बसलीयस
कोवळ्या उन्हात भिजणाऱ्या तुला बघून
त्यांचीही शुध्द हरपलीय

बेभान मी ही  झालोय,
म्हणून तर आज पुन्हा आलोय !
तुझी वाट बघतोय
थोडीशी स्वप्न रंगवतोय.

पण आधी मला एक सांग,
तुला ही  सवय लागली कधीपासून ?




काळजी


काळजी


करते अजुनी तितकेच प्रेम,
म्हणुन काळजी आहे तुझी !
वाटु नको माझे सर्व क्षेम,
कालची रात्र जागुन गेली !



पैंजण


पैंजण


पैंजण घालत नको जाऊ !
मला त्रास होतो. 
जरा काही किणकिणलं की 
मग भास होतो. 

कधीकधी हवेसे वाटतात, 
कारण तू येणार आहेस,
Image Source: Flicker
मला हळूच गाठायचाय,
तू जेव्हा त्यांना बजावतेस !

अधेमधेच वाजतात, 
नको त्या वेळी गडबड करतात,
दोन क्षण कुठे शांततेत जातात, 
तर हे दोघं कुजबुजतात ! 

तरीपण तू पैंजण घालणार, 
माझा जीव कासावीस करणार, 
एखादा नवीन जोड मागणार, 
मला बघून गोड हसणार ! 

म्हणून म्हणतो.....
पैंजण घालताच नको जाऊ !!!



 

सरीत भिजलीस


सरीत भिजलीस


ओल्या हातांना मेंदीचा सुवास,
ओल्या ओठांचा ओला स्पर्श,
पाणीदार डोळ्यांमधले अर्थ,
सुखावलो सखे, हा सहवास !



घट्ट झाली मिठी तुझी,
हात काही मागतात,
खाली ती दडली नाही,
गाल का लाजतात?



इच्छा


इच्छा  

माझी  कविता  तशी गुणगुणण्यासारखी !
आज तुला का म्हणायचीय ?
शब्दांमधल्या दडलेल्या अर्थाला ,
का वेगळाच सुर लावायचाय ?

अर्थ नाही खिशात माझ्या ,
पण अर्थहीन उधळले नाही ,
शब्द जपुन वापरलेत मी 
त्याची किंमत मोजतोय अशी !

ऐकायला मी नसणारे ,
हे गीत गाणारेस कुणासाठी ?
दोघं बसले असताना ,
एकांतात दूरच्या तळ्याकाठी !

गाण्याची सवय लावु नकोस ,
एकांतात कदाचित मी आठवेन ,
अंगा अंगाला होणाऱ्या स्पर्शात ,
फक्त मी आणि मीच असेन !

सर्व काही विसरून जा ,
माझे नवे गित घेऊन जा ,
आनंदाने जगण्यासाठी ,
ही एकतरी भेट ठेवुन जा!  





तुझाच


Image Source:
http://saimg-a.akamaihd.net/saatchi/7835/art/1567391/780285-7.jpg

तुझाच

मी आहे फक्त तुझाच
तू समजून घे. 
प्रेम कधी आटणार नाही
तू उमजून घे.

साद घाल जिवाला कधीही
तू पारखून घे.
विश्वास ठेव,  फिरणार नाही
आजमावून घे.


प्रणयगंध



प्रणयगंध

होती साथ द्याया
फुले रातराणीची
आज आस आहे
तुझ्या धुंद मिठीची. 


प्रणयगंध उधळीत तु
येशील जेव्हा कवेत
दिशा मार्गस्थ होतील
शितल  गंधा समेत.

ओठातले गुज तुझ्या
ऐकतील माझे ओठ
हातात हात द्याया
असतील माझे हात.

बेधुंद होऊन जा,
होऊन जा निःशब्द
सोडुन दे ते जग
आज मिलनात जग.



सखी

सखी


खूप काही दिलस,
एक मैत्रीण, एक सखी,
एक सुंदर सोबतीण म्हणून !

म्हणूनच,
आज शेवटचं मागायला आलोय.
पण फक्त आपल्या मैत्रीखातर
कधीही तोडू नको हे नातं
असेल पडलो कमी मी कुठेतरी
पण केलीय तेवढीच प्रिती तुझ्यावरती

तुझ्यारुपी एक गोंडस फुल
उराशी बाळगलं
आयुष्याच्या अवघड वाटेवर
तुला सांभाळल

पण हा भार नव्हे
या पाठी समर्पण आहे
म्हणूनच जिवनभर
हेच करण्याची इच्छा आहे.

तू मला नेहमीच हवीयस
हृदयाच्या सर्वात जवळ
एक सखी एक मैत्रीण
एक सुंदर सोबतीण म्हणुन.


स्वप्न


स्वप्न 

Source: https://s-media-cache-ak0.pinimg.com/

आज हळुच सखे 
येशील स्वप्नात का तु ?
गोड गुलाबी गाली 
सखे, थोडी हसशील का तु ?


नुसतेच स्वप्न नसावे 
स्वप्नात सत्य भासावे 
वेडा पिसा मजला पाहुन 
धुंदीच्या कुशीत तू शिरून 
सखे, थोडी लाजशील का तू ?


निःशब्द नको,
स्वप्न बोलके असुदे 
निल चक्षुंचे 
मला अमृत पिउदे 
सखी, थोडी बोलशील का तु ?



 


संध्याकाळ


संध्याकाळ


आज आपण  भेटू तिथे
आकाश मिळे धरेला जिथे !

समईची ज्योत विझावी,
स्पर्श मुक्त व्हावे,
ओठांनी काही बोलावे,
गालांनी काही ऐकावे.

रिकाम्या ओंजळीत तू
थोडेसे प्रेम मागावे
तव प्रेम करावे इतके,
ओंजळीत चांदणे दयावे.

सुरु होतील सरी पावसाच्या
बरसतील थोडे मोती,
वेचुन घे त्यातले काही,
आज डोळ्यांना झोप नाही.