सवय


सवय

तुला ही सवय कधीपासून लागली,
नदीतल्या संथ पाण्यात पाय बुडवुन बसण्याची?

तू पाय बुडवल्यावर,
पाण्यावर जे तरंग उमटतात ना
ते तरंग नाहीतच मुळी !
संथ पाण्यावर
ते उठलेले रोमांच आहेत
तुझ्या नाजूक स्पर्शाने
पाण्यालाही झालेली
तारुण्याची जाण आहे !

तुझ्या पायांची हालचाल पाहून,
मासेही कसे स्तब्ध झालेत.
जणू आपलं पोहोणच विसरलेत !
आश्चर्य वाटतंय त्यांना,
अशी डौलदार हालचाल
आपणही नाही करु शकत !

नदीकाठची फुलं आपलं अस्तित्वच विसरलीयत,
कारण तू तिथं बसलीयस
कोवळ्या उन्हात भिजणाऱ्या तुला बघून
त्यांचीही शुध्द हरपलीय

बेभान मी ही  झालोय,
म्हणून तर आज पुन्हा आलोय !
तुझी वाट बघतोय
थोडीशी स्वप्न रंगवतोय.

पण आधी मला एक सांग,
तुला ही  सवय लागली कधीपासून ?




1 comment:

Thank you for visiting !