Showing posts with label व्यथा. Show all posts
Showing posts with label व्यथा. Show all posts

मेघदूत



मेघदूत

हा सह्याद्री  नसता तर,
कदाचित वारे देशावर पोचले असते !
या ढगांनी माझे विचार,
तुझ्या अंगणात ओतले असते .




सकाळ





सकाळ

भिजले केस, ओल्या अंगाला
कोवळे उन स्पर्शुन गेले ,
तारुण्यात दिसतेस खास
रुळल्या बटेला सांगुन गेले.


त्या क्षणाला आठवुन तुला,
मन माझे मोहरून गेले.
स्पर्शातल्या मोरपीसांची,
आठवण ओठ सांगुन गेले.





व्यथा


व्यथा

तुझ्या डोळ्यात एक नशा होती,
आता सर्व काही संपले.
ते कुणासाठी तरी आसुसलेले होते,
आता कुणापायी तरी घाबरलेले !