Showing posts with label charoli. Show all posts
Showing posts with label charoli. Show all posts

तोहफा


वक्त का मिला है तोहफा

वक्तसे न लूट पायेगा

कागज पे नाम जो लिखा

वक्तसे न मिट पायेगा


______________________



एक सवाल है छोटासा

जवाब क्या आएगा ?

सवाल तो तुम हो

सही जवाब ही आएगा


                                  




मजदुर





दिनभर इस पेट के 
लिये काम करते है 
शरीर के बाकी अंग
रातमे याद आते है!

                              
          


काही चारोळ्या - २



काही चारोळ्या - २

  




अबोल  स्तब्ध दगडात
उमलली फुले दोन
गळ्यातल्या गाठीभेटी
हेच दोघांचे स्वप्न रोज !





कालची रात्र जागून गेली !

करते अजुनी तितकेच प्रेम
म्हणुन काळजी आहे तुझी
वाटु दे नको माझे सर्व क्षेम
कालची रात्र जागून गेली !



काही चारोळ्या - 1


काही चारोळ्या  - १

खळी

अवीट मिठीची गोडी
आणीक गालावरली खळी
लाजलीस सखे अशी तू
स्मित ओठी अवखळी !


मेघदूत 

हा सह्याद्री नसता तर
कदाचीत वारे देशावर पोचले असते
या ढगांनी माझे विचार
तुझ्या अंगणी ओतले असते !



हार-जीत 

ही माझी जीत नव्हती, 
ती एक हार होती .
आता ही सवय मोडायची होती,
कारण ही लढाई शेवटची होती !
 

व्यक्त 

केसांच्या बटांना थोडे रुळु दे
गालावरच्या खळीला मग हसू दे !
प्रेमात आपल्या तोच वसंत येऊ दे
जपलेल्या भावनांना ओठी बोलू दे !


शक्य असेल तर …. 

जमलं तर  एवढं करत जा
अधून मधून हसत जा
बाकी कुणाकडे नाही पण ….
निदान माझ्याकडे बघत जा ! 


चार ओळी तुझ्यासाठी : भावना



चार ओळी तुझ्यासाठी : भावना 

*

कधीकधी शब्द अपुरे पडतात ,
भावना व्यक्त करताना,
आज भावनाच अपूऱ्या पडल्या 
तुला शुभेच्छा देताना !


*

तुला समोर पाहताच 
मनाची अनेक छकले होतात 
निम्मी माझ्या अन निम्मी तुझ्या बाजूने 
फक्त भांडत सुटतात !

*

तु दिसताच प्रसंगांनी मनात गलका केला 
माझ्यासाठी हा क्षण पुरेसा बोलका होता 
आठवणी आठवणीने विसरताना मात्र 
माझ्या आठवणींना शहारा आला होता !

*

भावनांच्या उद्रेकाने कधीतरी
कवितेचा आधार घ्यावा. 
दाटलेल्या आसवांना रडण्यासाठी ,
थोडा तरी वाव द्यावा !
By Paresh Kale







Image Source: http://usaginoyume.deviantart.com/art/You-and-beautiful-world-163019240


चार ओळी तुझ्यासाठी : तू सोडून जाताना !



चार ओळी तुझ्यासाठी : तू सोडून जाताना !



मराठी ऋतु सहा असले तरी 
माझ्या प्रेमात ते दोनच आहेत !
तू जाशील तेव्हा ग्रीष्म तर 
येशील तेव्हा वसंत आहे !


चार ओळी तुझ्यासाठी : लग्न



चार ओळी तुझ्यासाठी : लग्न 




जन्मोजन्मी तू माझी असावीस,
हा माझा अट्टाहास होता. 
दुर्दैवाने तुझ्या डोक्यावर पडलेल्यांपैकी ,
काही अक्षता माझ्याही होत्या !








आज तू भेटल्यावर सांगायचं होतं !
तू माझ्या हृदयात कायमची आहेस. 
तुझं मंगळसूत्र बघून मात्र एवढच म्हटलं,
तू कशी आहेस ?






कधीतरी माझं लग्न होईल,
उद्या तुझं आहे !
तुला मी माझ्याच नावावरून चिडवण्याचा 
हा मात्र शेवटचा दिवस आहे !



By Paresh Kale



Image source: http://legaljunction.blogspot.in/2011/07/ceremonies-essential-for-valid-hindu.html



चार ओळी तुझ्यासाठी : ताज





चार ओळी तुझ्यासाठी : ताज 



 सौंदर्यांची स्तुती करताना चाहते म्हणतात,
 " अरे हुजूर वाह ताज बोलिये !"

 माझ्यासारखा एखादाच मात्र म्हणतो,

 " ताजमें मुमताज की कब्र खुदी है !"






By Paresh Kale


चार ओळी तुझ्यासाठी : भुरभूरणारे केस




      चार ओळी तुझ्यासाठी : भुरभूरणारे केस 





मला सारखं बजावातेस तू,
केसांना हात नको लावू 
हेच वाऱ्याने केल्यावर मात्र 
म्हणतेस "आता मी काय करू ?"



चार ओळी तुझ्यासाठी : नशीब



चार ओळी तुझ्यासाठी : नशीब 



नियती कधी कधी 
किती क्रूर वागते !
जो आधीच मेलेला असतो,
त्याला आणखी मारते … 


*****

मला जिवंतपणी जाळताना,
या चिंतेनं थोडं तरी भान ठेवावं,
मेल्यानंतर सारणांसाठी 
काहीतरी शिल्लक ठेवावं !



by Paresh Kale





वर्षण - ग्रस्त




वर्षण - ग्रस्त 



पाउस अखंड कोसळत होता 

सोबत निदान माझे अश्रू होते. 

मीही उभा कोसळत होतो 

शेवटी स्वप्नांचे उरलेले ढिगारे होते. 


                                                                            By Paresh Kale

भाद्रपद




- भाद्रपद -


कुंद गारव्यात उन कोवळे ,

सरल्या श्रावण सरी !

नाजूक अंकुर तटावरती,

नटली सृष्टी सारी.

Read my more poems here.

                                                         By Paresh Kale

स्थिर



स्थिर 




          माझ्या जीवनात आलीस, 
          फ़ेसाळत्या शुभ्र लाटेसारखी, 
          तशीच निघुनही गेलीस, 
          पायाखालच्या वाळुसारखी  !






तुझा आवेग होता लाटेसारखा, 
येताना बहरत होता, 
पण जाताना मात्र, 
सर्व काही घेऊन जात होता !






Read my more poems here.

                                 By Paresh Kale

थेंब



थेंब 


एक थेंब ओलेता, 

गालावरून ओघळला, 

उमजायच्या आत 

जमिनीत विसावला !

        - परेश काळे          

स्पर्श



-- स्पर्श --


अलगद माझा धरलास हात
यौवनाची आज छेडलीस तार.
झाले शब्द मुके अडले ओठांत 
डोळ्यात शोधे काही वेडी नजर !

                                                           - परेश काळे 

भेट



This time some watercolor effect. Its subtle, see photo in full screen mode. Matching theme poem was written 

by me some 5 years back. :-)








Read my more poems here.


By Paresh Kale