स्वप्न
आज हळुच सखे 
येशील स्वप्नात का तु ?
गोड गुलाबी गाली 
सखे, थोडी हसशील का तु ?
नुसतेच स्वप्न नसावे 
स्वप्नात सत्य भासावे 
वेडा पिसा मजला पाहुन 
धुंदीच्या कुशीत तू शिरून 
सखे, थोडी लाजशील का तू ?
निःशब्द नको,
स्वप्न बोलके असुदे 
निल चक्षुंचे 
मला अमृत पिउदे 
सखी, थोडी बोलशील का तु ?

 
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !