Teeny-weeny Niagara.....from Konkan



Teeny-weeny Niagara from Konkan




आबलोली गाव थोड्याच अंतरावर उरलं होतं. सभोवताली बऱ्यापैकी हिरवळ होती, चार वाजता देखील संध्याकाळ झाली  वाटत होतं, रस्ता सुन्नपणे पहुडला होता. एकतर समोरून येणारया  गाडया कमी नसल्याने मी मस्तवालपणे  गुणगुणत होतो. तेवढयात अचानक  लक्षात आलं ते या धबधब्याविषयी. खुप वर्षांपुर्वी या मार्गे जाताना घाईघाईने  चित्र मी टिपलं होतं ते डोळ्यासमोर तरळू लागलं. आपण स्पॉट पार केलेला नाही हे पक्कं ठाउक होतं, त्यामुळे मी थोडा सतर्क होऊन गाडी चालवायला  केली.  माझा अंदाज बरोबर ठरला, एक दोन किलोमीटर पुढे गेल्यावर मी त्या ठिकाणी पोचलो. 




माझ्या नशिबाने धबधबा अजून जिवंत - प्रवाही होता. तसं बघता त्याला धबधबा म्हणणं चुकीचंच होतं, पण मग मराठीत त्याला दुसरा समर्पक शब्द नाहीयेय. नवीन पूल झाल्याने जुना रस्ता (जो कमी उंचीवर होता), आता उपयोगात नाहीयेय. या रस्त्यावरून प्रवाह जात असल्याने, पाण्याच्या कोरीव कामगिरीमुळे रस्ता अर्धगोल कापला गेलाय.  दुसऱ्या बाजुला थोड खोलगट भाग असल्याने हा प्रवाह अंदाजे ५-७ फ़ुटांवरुन कोसळतो इतकच. त्याला ना खूप उंची होती ना त्यात खूप सारं पाणी ! पण एकंदर कलाकृती मात्र अप्रतीम जमली होती. 


माझ्या नशिबाने योग्य तेवढे पाणी असल्याने त्या दृश्यातली मजा मी टिपु शकणार होतो. योग्य कोनातून फ़ोटो घेतल्यास हा प्रती नायगाराच वाटतो - अर्थात छोटी प्रतिकृती. अशा या मिनी - मिनी नायगरयाची प्रकाश-चित्रं तुमच्यासाठी. पावसाळ्याच्या आसपासकधी या मार्गानं गेलात तर इथे जरूर थांबा !


संग्रहातून:

वर  लिहिल्याप्रमाणे हा "धबधबा" मी सुमारे ८ वर्षांपूर्वी बघितला होता. मित्रांना जबरे गाडी थांबायला लावून इथे फ़ोटो घेतले होते, ते इथे पोस्ट करत आहे. त्यावेळी SLR कॅमेरा नव्हता, त्यावेळचे हे फ़ोटो म्हणजे कल्पनाविलासाला आधार, एक प्रकाराचं टाईम मशीन.  जुनी व आताची परिस्थिती पडताळुन पहाण्यातली वेगळी मजा घेण्यासाठी हा खटाटोप ! हे भर पावसातले फ़ोटो आहेत, त्यामुळे पाणी अंमळ जास्तच आहे, तसेच धबधब्याचा अर्धगोल "पूर्ण" आहे …… 






View Larger Map

2 comments:

Thank you for visiting !