बुला रहा है कोई !


----------------------------

बुला रहा है कोई !

----------------------------




फुलनुमा जिंदगी को उधेड़ दिया,
कब्र पे फुल चढाने बुला रहा है कोई !


इतना रुलाया और आसू भी न पोछे,
फसानेगम सुनाने बुला रहा है कोई !


दुआ क्या चीज़ है ? पूछता रहा उम्रभर
खुदके लिए दुआ माँगने बुला रहा है कोई !


जिन्दा रहते सादगी का शौक न किया,
आज आबरू बचाने बुला रहा है कोई !

------------------------------------




गारवा ....


गारवा ....




Read my more poems here.

हे माडानो !


हे माडानो !





मी नक्की येइन !







Words : By Paresh Kale
Photo Source : Unknown


Read my more poems here.


अर्थ क्रान्ति


अर्थ क्रान्ति


अमेरिकेतल्या मंदी पुढे निदान अजुन तरी भारतीय अर्थव्यवस्था तग धरून आहे. याला भारतीय माणसाची बचत करण्याची मानसिकता , सोन्याची असलेली आवड , रिजर्व बँकेच्या योजना इत्यादि कारण देता येतील. हे चित्र खुप चांगले आहे हे निश्चितच. पण ज्यावेळेस आपण महासत्ता होण्याचा विचार करतो तेव्हा हे चित्र अपूर्ण आहे अस मला वाटत.

अजुनही आपण परदेशी गुन्तवणुकीवर अवलंबून आहे. परिणामी इतर प्रगत देशामधील मंदीची झळ आपल्यालाही पोहोचते. विकास दर घटतो, बेकारी वाढते. अशा अवस्थेत आपण अशी काही पावले उचलू शकतो का जेणेकरून आपण आर्थिक बाबतीतही बरयापैकी स्वावलंबी होऊ?

एक उदाहरण आपल्या चंद्र मोहिमेचे वा अणु कार्यक्रमाचे घेता येइल. आपण अणुस्फ़ोट केला तेव्हा सर्व प्रगत देशानी विरोध केला व असहकार पुकारला. अंतराळ सन्शोधनातहि आपल्याला फारशी कुणाची मदत नव्हती ( जी काही मदत होती ती जागतिक राज कारणा खाली होती ). इसरो, टी आय एफ आर सारख्या संस्था उभारून आपण या बाबतीत स्वतंत्र झालो. असाच काही अर्थ व्यवस्थे मधे करता येइल का? अर्थकारण , समाज कारण यांचा मेळ किती आहे हे नव्याने सांगायला नको. या दोघानाही एकत्र बळकट करण्याचे प्रयत्न करता येतील का?

शक्य आहे ... यावर एक "अर्थ" पूर्ण लेख वाचनात आला.

"अर्थ क्रान्ति "

http://www.arthakranti.org/index.htm

अनिल बोकिलानी सुरु केलेली चळवळ उल्लेखनीय आहे. या वेब साईट वर आपल्याला त्यानी मांडलेले अभ्यास पूर्ण विचार वाचायला मिळतील. विविध प्रेझेंटेशन , लेख, आकृति  याने  परिपूर्ण व सोप्या शब्दात मांडणी , विषयाची सखोल चर्चा... आणखी काही लिहित नाही ...वाचा विचार करा व कृति करा ...


सोबत


सोबत




फोटो : पवई लेक मधील ताडाची झाड़



Read my more poems here.


ग्राफिटी


ग्राफिटी 


बावन्न पत्त्यांच्या सेट मधे घुसलेले कार्ड नेहमीच जोकर असते....

चहा हवा , कॉफी / बियर हवी, पाणी हवे ...सगळी पेयच ना मग भेद कशाला !

शत्रुवर प्रेम करा ..विशेष करून जर ती मुलगी असेल तर!

हातात चांगले पत्ते असतील तर चिटिंग  का करायची? .. कारण तो सवयीचा भाग असतो !

परेश नीति


परेश नीति


गोष्ट पहिली :


खुप वर्षां पूर्वीची गोष्ट...एक आटपाट नगर होत...सर्व सुरळीत चाललेले असते, आलबेल असते.

...अचानक एके भले सकाळी दिवशी राजवाड्याला बेसुमार आग लागते. सैनिक आग विझवण्यासठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते...नागरिक ही त्याना मदत करत होते. तरीसुद्धा आग काही कमी होत नव्हती...तेवढ्यात एक कोकिळा जवळच्या झाडावर बसून गायला लागते. तिचे कुजन  ऐकून एका सैनिकाला प्रचंड राग येतो.  तो रागाच्या भरात एक दगड तिच्या दिशेने भिरकावतो व तो लागून ती कोकिळा मरते.

हे बघुन दुसरा सैनिक त्याला विचारतो "तू तिला का मारलं स? "

तेव्हा पहिला उत्तरला " अरे इथे आग लागलीय आणि ही खुशाल गातेय ...".

यावर दूसरा म्हणाला " अरे प्रत्येक प्राणी एक विशिष्ट काम घेउन जन्माला आलेला असतो. कोकिळेचं काम हे गाणं  , आपल काम आग विझवणं. ती कशी काय आपलं  काम करू शकेल?"



गोष्ट दूसरी :

आमच्या शेजारचं  घर गोखल्याचं. रिटायर्ड झालेले असल्याने काका दिवसभर टिव्ही बघत बसत...दूसरा काही विरंगुळाच नव्हता..उभं आयुष्य पोस्टात गेल्याने एखादा छंद जडण्याचा  काही संबंध नव्हता ...नाही म्हणायला एक कुत्रा बाळगलेला होता, ज्याला ते संध्याकाळी फिरायलाही घेउन जात असत...

एके दिवशी सकाळी अकराच्या सुमारास काका लगबगीने घराबाहेर पडत होते. काकुंचा पाठून आवाज ऐकू येत होता " अहो कुठे जाताय? निदान काही खाऊन तरी जा...आणि हो जातच आहात तर भाजी घेउन या ...टोपी विसरलात ..."

हे म्हणेपर्यंत काका गेटच्या बाहेर देखील पडले होते...सुमारे एका तासानंतर परत आले ते खुप काही खरेदी करून... त्यात काही पुस्तक होती, एक चामड्याचा पट्टा व वेताची छड़ी देखिल ... काकुंच्या काहीच लक्षात न आल्यावर ते म्हणाले " अग मी रिकाम टेकडा दिवसभर काहीच विरन्गुळा नाही ..आज ज्यावेळी टिव्ही वरच्या बातम्या बघितल्या आणि ठरवल....आपण मुंबईत रहातो..आपण मराठीच बोलले पाहिजे व सर्वानी मराठीच बोलले पाहिजे हे पटलं ..पण आपण दोघ तर मराठीच बोलतो , मग कुणाला बर मराठी बोलायला लावायाचं  असा प्रश्न पडला होता…

..आणि मग लक्षात आलं की आपला कुत्रा टॉमी कुठे मराठी बोलतो?"


माझी कणेकरी


माझी कणेकरी 


एक गोष्ट पहिल्यांदाच क्लिअर करतो की हा अशा प्रकारचा ( म्हणजे मी कुणाची (ही) स्टाइल ढापून लिहिलेला , थोडक्यात मी genuine लिहितो ) पहिलाच लेख आहे तरी उगाचच आपली मुक्ताफ़ळ यावर उधळु नयेत. आणि हे मान्य करतो की आयुर्विमा , सचिन (सुनील गावस्कर निवृत्त झाल्याने) , लता व महामहिम शिरीष काणेकर याना पर्याय नाही.

तसेच लेखक समजदार असल्याने त्याने क्रिकेट , चित्रपट असे चघळलेले विषय न घेता परंतु कुणीही कितीही बोलू शकेल असा विषय घेतलाय --- मुली व बायका ( हाय काय बिशाद आहे बोलायची) .... बघा समोर ही नाही तर मागुनहीं बोलू शकत नाही तुम्ही ? ( हा शब्द आपण असा वाचावा ) ...
इथे मी काही टिप्स देणार आहे त्या तुम्हाला ( खचितच ) उपयोगी पडतील :

१. मुलींचे आवडते विषय जाणुन घ्या --- त्यांच्याशी बोलताना त्यांच्या भूतकाळा विषयी शक्यतो बोलू नका... त्याना आवडत नाही ...मुलीना भूतकाळ नसतो... म्हणुनच त्यांचे वय भराभर वाढत नाही .... जर ती काकुबाई असेल तर flirting म्हणजे नेक्स्ट टू महापाप आहे ही वाक़ये उपयोगी पडतील.

२. मुलीना सामान्यपणे चौकलेट , गणपती , गुलाबी रंग , रुत्विक / शाहरुख , आइसक्रीम या गोष्टी आवडतात ( यात काय विशेष नविन सांगितलंत ? कबुल आहे माझे वाचक एवढे हुशार आहेत हे मला माहीत आहे ...) सांगायची गोष्ट ही की याचा उपयोग फक्त गिफ्ट देण्याकरता नव्हे तर बोलताना पेरणी करण्याकरता होऊ शकेल. उदा. हळूच माहीत करुन घ्या शाहरुख का रुत्विक ... मग झाल रुत्विक आवडला तर शाहरुखला कसला डान्स येतोय ? म्हणा...बघा काय मजा होते ती... यापाठी लॉजिक अस आहे की जनरली एक आवडत असेल तर दूसरा आवडण्याची  शक्यता कमी ... अर्थात दोन्ही आवडण्याची पण शक्यता असल्याने कमेन्ट करताना सावध....

३. जर तुम्ही बाइक वापरत असल तर रस्त्यातून जाताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ... एखादी मुलगी / बाई गाडी चुकीची चालवत असेल तर तिला काहीही बोलू नका ...तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते ..... याच कारण आहे त्यांची समजूत ...अखिल रस्ता महामन्डळ हे त्यांच्या घरचे / माहेरचे आहे व तिचे वडिल (तुमच नशीब फ़ळफ़ळल तर तुमच्या सासरयाचे ) आहे. लग्न झाल्यावर ते रुखावताबरोबर आलेल आहे असच वाटत असत त्याना.

ट्रिंग ... ट्रिंग....

गर्ल फ्रेंड चा कॉल दिसतोय ...

बाकीच्या टिप्स पुढल्या वेळेस !


तू निरागस...


तू निरागस...


सिमल्याला भेटलेली ही लहान मुलगी. मी काढलेला, मला आवडलेला एक फ़ोटो.

डेवलप करतो आणि घरी पाठवून देतो म्हटल, तिच्या वडीलान्कडुन कार्ड ही घेतल.... आणि ते कार्ड मी हरवलं ...हे पोस्ट फ़क्त तिच्यासाठी....

देव करो व हा फ़ोटो ती, तिचे कुटुम्बिय बघोत...

















' ब्लाइंड रेज '



जागतिक साहित्यातली ही सर्वात लहान कथा : '  ब्लाइंड रेज  '



एक पूर्ण आंधळा इसम ट्रेनमधून प्रवास करीत होता. 

गाडीत खूप गर्दी  होती. 

गर्दीत  त्याचं कुणाशी तरी भांडण झालं. 

त्या इसमाने या आंधळ्याला थप्पड लगावली. 

आंधळ्याला राग आला आणि त्यानं खिशातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. 

यात सहा प्रवासी मारले गेले. 




मात्र त्यात तो माणूस नव्हता ज्यानं त्या आंधळ्या इसमाला थप्पड लगावली होती. 


Movie Review: Snow Walker (2003)



Movie Review: The Snow Walker (2003) 


अत्यंत प्रगल्भ दिग्दर्शन , उत्कृष्ट संवाद, मनमोहक सिनेमेटोग्राफी .... Into the wild सारखाच एक सिनेमा. Farley Mowet च्या कादंबरीवर आधारित ....फार कमी दिग्दर्शक असे धाडस करतात ... एक अप्रतिम व बघण्यासारखा चित्रपट ... जोड़ी म्हणुन हीरो हिरोईन न आवडले तर नवलच ! तिचा तर हा पहिला चित्रपट ...
आश्चर्य म्हणजे याला एकही महत्वाचे अवार्ड नाही ... नशिबाने IMDB वर ७.५ रेटिंग असलेला हा चित्रपट.




माझ रेटिंग : ****




यातील एक पात्र शेफर्ड च्या तोंडची ही सुरेख वाक्य :

Oh! I have slipped the surly bonds of earth, And danced the skies on laughter-silvered wings; Sunward I've climbed, and joined the tumbling mirth Of sun-split clouds, - and done a hundred things You have not dreamed of - Wheeled and soared and swung High in the sunlit silence. Hov'ring there I've chased the shouting wind along, and flung My eager craft through footless halls of air... Up, up the long, delirious, burning blue I've topped the wind-swept heights with easy grace Where never lark or even eagle flew - And, while with silent lifting mind I've trod The high untrespassed sanctity of space, Put out my hand, and touched the face of God!






Plot:

In 1953, in Artic, the pilot Charlie Halliday (Barry Pepper) is very well-paid to change his flight plan and bring the local native with tuberculosis Kanaalaq (Annabella Piugattuk) to a hospital for treatment. However, he crashes the plane and they have to struggle for survival. Charlie learns with Kanaalaq how to survive in the cold region, forming a bond of respect and friendship with her

 The Snow Walker
(2003) on IMDb

IMDB Link:



http://www.imdb.com/title/tt0337721/plotsummary



Ratnagiri to Guhagar via Bhatgaon bridge


Ratnagiri to Guhagar via Bhatgaon bridge


रत्नागिरी पासून गुहागर ला जातानाचा रस्ता (राई भातगाव मार्गे ) निसर्गाने नटलेला आहे. निर्जन वळणान्चा रस्ता , मधेच लागणारी खेडेवजा गाव, गर्द  झाडी, डोंगर आणि झरे ...अशाच एका झरयाचा हा फोटो .







चल चालीवर


चल चालीवर !


चल चालीवर बघ सखे
भिजले नितळ तनु आज,
खुशाल सोडून दे पदर
जलबिंदु लावण्याला साज !




Read my more poems here.




चार ओळी तुझ्यासाठी !


चार ओळी तुझ्यासाठी !


भावनांचा फुलोरा शब्दांचा धुमारा,
काळाच्या गर्दीत मनाचा पसारा.
जपताना त्या आठवणी
चार ओळी तुझ्यासाठी !




Read my more poems here.