दुरावा
या तरुतळी
एकलीच मी
हात दे सख्या रे
घायाळ मी हरिणी
पाहते वाट तुझी
आज तरी येशील तू
अवस्था गूढ माझी
कान शीळ देशील तु
विरले आभाळ सारे
भिजवुनी सरला दिवस
पाय घरला परतले
रात्र पुन्हा एक अमावास
मोजीत तारे
रात्र चालली
चंद्राच्या प्रकाशात
रातराणी फुलली
नाही मला काय त्याचे
डोळ्यांनी रात जागली
आयुष्य असे क्षणभंगुर
लावु दे भैरवीचा सुर
मिटवून टाक अंतरे
आज तरी ये बरे!
येशील स्वप्नात तू
इतुके मज ठाव आहे.
अभागी नशीब आहे
डोळ्यात मात्र जाग आहे.