काही (च्या काही !) Interview :
1.........
प्रश्न :काल रात्रि दहशत वादी हल्ला झाला तेव्हा काय करत होतात?
शिव रोज नयालेंगा करजी : काही नाही झोपलो होतो. रात्री ११ च्या सुमारास फोन वाजला. मला वाटल मैडम चा असेल. बघतो तर आपले आबा. मी म्हटल " आबा तुमची घुसमट होते कळतय मला. पण आता कुठे फोन केलात ? एवढी सुखाची झोप घेत होतो.". तेवढ्यात लक्ष गेल अरे आपण नविन सफारी घातलेला न बदलता तसेच झोपी गेलो. नुकताच शिवला होता हो तो , पहिल्याच वेळी घातला होता. शिवाय एवढे नाईट सूट असताना हा कसा घालायचा ना ? आणि समजा मी सफारी घालून झोपलो हे तुम्हा पत्रकाराना कळल तर, उगाच पुन्हा नाचक्की नको, काय समजलात?
प्रश्न : अहो आम्ही दहशतवादी हल्ल्याबद्दल विचारतोय ?
शी.रो.न.लें.करजी : हे अस असत तुमच. हेरवि कपड्याबद्दल विचारता म्हणुन आज त्या बद्दल बोललो...आधी सांगत जा ना नक्की कशा बद्दल विचारताय ते.
प्रश्न: उत्तर देताय ना ?
शी.रो.न.लें.करजी : (सगळे चॅनल वाले आहेत ही खात्री करून ) हम इस दहशत वादी कृत्य का निषेध करते है. मेरी लोगोंसे अपील है की वो शांत रहे और सब्र बरते (ऐसा ही सहते रहो और हमें मदद करते रहो) इस तरह घटनाए भविष्य में घटित नहीं होगी इस की खबरदारी ली जायेगी. इस विषय में एक आपातकालीन मंत्री मंडल की बैठक अभी कुछ ही देर में होगी. जिसमे किसने कितना बोलना है और कब बोलना है ये तय किया जायेगा.
प्रश्न: मंत्रीजी और एक सवाल ....
----------------------------------------------------------------------------------------------
2........
प्रश्न : इंग्लंड ने आपला टेस्ट दौरा रद्द केलाय , काय म्हणण तुझ याबद्दल ?
के (व्हातरी) विन : आधीच पुरती बोलती बंद झालीय यापेक्षा आम्ही काही बोलू पण शकत नाही आहे. एवढ बोलायला आमच्यात जीव शिल्लक आहे हे ही काय थोड आहे का? आणि दौरा रद्द करायची आयडिया माझीच होती, सगळ्यानि ती एकमताने उचलून धरली. (म्हणुनच मी लहान वयात कैप्टेन झालो) भारताच्या लोकसभेसारख नाही आहे आमच्यात. मालिका रद्द करण्यात आपला फायदा आहे हे सगळ्याना न सांगताच कळल.
प्रश्न : मग आता या रिकाम्या वेळात काय करणार ?
के (व्हातरी) विन : या दौरयात आम्ही मुद्दाम हुन भारतीय खेळाडु, जास्त घेतले होते. विचार केला, आम्ही नाही निदान ते तरी खेळतील. तसच झाल बघा. परत गेल्यावर पूर्ण १० भारतीय असलेली टीम बनवणार आहे. भारताबरोबर तीच टीम खेळणार. बाकी देशा बरोबर दूसरी टीम. पुढल्या वर्षीच्या भारताच्या इंग्लंड मधील मालिकेत तीच टीम खेळेल. (अशी अक्कल हे कॅप्टन शिप मिळण्याच दूसर कारण )
प्रश्न : एक मिनिट , टीम मधे ११ प्लेयर असतात न?
के (व्हातरी) विन : मला नको काय खेळायला ? च्यायला कैप्टेन लाच काढताय?
प्रश्न : तू हा interview मराठीत दिलास , कोई खास वजह ?
के (व्हातरी) विन : अरे बाबा तू आहेस मराठी , उद्या मी तुझ्याशी मराठीत नाही बोललो म्हणुन तुम्ही इंग्लंड मधे येउन तिथे भारताबरोबराची मालिका बंद पाड़ाल. नेम नाही तुमचा . तिथे तरी जिंकू दया न आम्हाला !
-----------------------------------------------------------------------------------------------
3.......
प्रश्न : इंग्लंड ने आपला टेस्ट दौरा रद्द केलाय , काय म्हणण तुझ याबद्दल ?
राहून द विट : क़सल काय दहशत वादी आले की चाहू बाजुनी येतात. आय मीन संकट आली की समुद्रातून येतात. सॉरी चाहुबाजुन येतात. हे अस होते आजकाल. मुद्दा असा की २ टेस्ट खेळायला मिळणार होत्या त्याही गेल्या. आता पुढल्या इंग्लैंड दौरयापर्यंत बसायच घरात. आजकाल कुणी AD मधे पण घेत नाही आहे.
प्रश्न : रिकाम्या वेळेत काय करायचा बेत आहे ?
राहून द विट : बघतो, ग्रेग आणि मी काहीतरी नविन प्लान काढूच. तस् मला राज कारणाच आकर्षण वाटायला लागलय. तिकडे जाइन म्हणतो.
प्रश्न : राज कारण आणि तू ? तुझ्यात अशी कोणती quality आहे?
राहून द विट : अहो अस काय करताय, माझ टोपण नाव काय आहे? The Wall , म्हणजे एकदा निवडणुक जिंकलो की वर्षानुवर्षे तिथेच ! काय बरोबर ना ! शरद काकानी मला नेहमी मदत केलीय आताही करतील
प्रश्न : खरय, त्यांचा हात नसला तरी ते जादू दाखवू शकतात आणि हाताशिवाय टाळी ही वाजवू शकतात. भविष्यासाठी शुभेच्छा !
-----------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !