1. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवता ...
बाबासाहेबांचे अनुयायी म्हणविता आणि असे कृत्य करता ? हे योग्य आहे का , असा प्रश्न आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या अॅड . संघराज रुपवते यांना कोर्टाने केला . असा प्रकार बाबासाहेबांनीही मान्य केला नसता , गौतम बुद्ध हे तर अहिंसेचे प्रतीक होते , असेही उद्गार कोर्टाने काढले . ही जागा तुम्हाला नव्हे , तर राज्य सरकारला मिळणार आहे . त्यामुळे तुम्ही काय सरकारचे प्रतिनिधी आहात का , असाही मुद्दा कोर्टाने मांडला .
2. लोक मजा मारायला न्यायालयात येतात असे तुम्ही समजता का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केला. महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या भूखंडाबाबत सुनावणी सुरू असताना न्यायालयाने ही विचारणा केली. महापालिकेच्या वकिलांना अर्थातच याचे उत्तर देता आले नाही. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना घरे बांधण्यासाठी एक भूखंड देण्यात आला. कर्मचाऱ्यांनी त्याचे पैसे भरले. पण आज २८ वर्षे उलटली तरी तो भूखंड कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.
3. पालिकेतील सुशिक्षित कर्मचारी अंगठा ठेवण्यास विरोध करण्याची शक्यता असल्याने दोन्ही हातांच्या पहिल्या तीन बोटांच्या पेरांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. यापैकी कोणत्याही एका बोटाने मशीनवर हजेरी लावता येईल.
4. ' इंदु मिल ' मध्ये ठाण मांडुन बसलेल्या आंदोलकांशी चर्चा काय करता? ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी चर्चा केली होती का ... असा संतप्त सवाल करणाऱ्या हायकोर्टाने आंदोलकांवर कारवाई न करणारे राज्य सरकार ' कणाहीन ' व ' निष्क्रिय ' असल्याची टीका गुरूवारी केली . त्यामुळे सात दिवसात चर्चेने प्रश्न सोडविण्यात येईल व आंदोलक बाहेर न पडल्यास त्यानंतर तीन दिवसात पोलिस बळाचा वापर करून त्यांना बाहेर काढण्यात येईल , असे आश्वासन सरकारने कोर्टाला दिले .
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !