पाणी नियोजन

पाणी नियोजन 



पाणीच पाणी चहुकडे, गेले नियोजन कुणीकडे  !

आहेत योजना बहुत, परंतु थांबा थोडे,
गिरवीत आहोत नियोजनांचे जुनेच धडे !

तहानल्या शेतीला झाले पाण्याचे वावडे. 
कल्पनांच्या जगात नुसतेच कागदांचे सडे.

कुठेतरी पूर, कुठेतरी अपुरं , काय करू आम्ही वेडे ?
पाणीच पाणी चहुकडे, गेले नियोजन कुणीकडे ?


नद्या जोडणी, प्रकल्प धरणे आहेत शब्दांचे बुडबुडे,
उज्वल भारताच्या भविष्यावरी का हे पाण्याचे शिंतोडे ?

पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवा, लावा झाडे,
होईल पाणी चहुकडे, होईल जेव्हा नियोजन सर्वकडे !

पाणीच पाणी चहुकडे, गेले नियोजन कुणीकडे  ?

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !