काही कथा (भाग -३)


काही बोध कथा (भाग -३) :


एकदा श्रीविष्णूंना दूधसागरामध्ये शेषावर पडून राहाण्याचा कंटाळा आला. त्यांनी काहीतरी निर्माण करण्याचे ठरवले. वाटले, त्याची देखभाल करण्यात मजेत वेळ जाईल. त्यांनी ब्रह्मदेवाला पाचारण केले. ब्रह्मदेव श्रीविष्णूंसमोर हात जोडून उभे राहिले. 

नारायणाने आज्ञा केली, "एक छानपैकी सृष्टी निर्माण कर. रंगीबेरंगी फुलापानांनी बहरलेली. पशुपक्ष्यांनी गजबजलेली, जलचर, वनचर आणि अदृश्य पण शक्तिमान कृमिकीटकांनी दाटलेली, अशी सृष्टी निर्माण व्हायला हवी. मनुष्य तिचा मध्यबिंदू असायला हवा."

विधाता कामाला लागला. पण दोन दुष्ट क्रूरकर्मा राक्षस त्याच्या कामात एकसारखा अडथळा आणू लागले. ते दैत्य त्याला छळत. विष्णूच्या आज्ञेचे पालन कसे करावे हा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला. तो लक्ष्मीदेवीकडे गेला. त्याने आपली अडचण देवीला सांगितली. लक्ष्मीला सुरुवातीला दैत्यांचा राग आला. देवीने दैत्यांना शाप द्यायचे ठरवले. 

ण नंतर ब्रह्मदेवांना विचारले, " दैत्य कोणी निर्माण केले? "

"अर्थात भगवंतांनी!"  ब्रह्मदेव म्हणाले.

" झालं तर! दैत्यांची निर्मिती करण्यामागे श्रीविष्णूंचा काही हेतू असावा. मी त्यांना शाप देणार नाही. त्यांच्याशी सामना करतच तुम्हाला सृष्टीची निर्मिती करावी लागेल ", लक्ष्मीदेवी म्हणाल्या. 

ब्रह्मदेवाने दैत्यांशी लढत लढत हवी तशी सृष्टी निर्माण केली. हा झगडा सृष्टीबरोबरच जन्माला आला. 

(Source: http://tinyurl.com/nc2mthp)







भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी कुराणाचा अनुवाद केला. 

तो प्रकाशित होण्यापूर्वीच एक अनोळखी पठाण त्यांच्याकडे आला व म्हणाला, 'आपल्या ग्रंथासाठी खूप काटकसर करून चाळीस रुपये जमवले व काबूलपासून थेट कोलकात्यापर्यंत पायी आलो. मला नाही म्हणू नका.' 

मौलानांनी त्या पठाणाला घरी ठेवून घेतले. पाहुणचार करून त्याला परतीचे तिकीट काढून दिले. त्याचा पत्ता लिहून घेतला. तो अनुवाद प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रत त्याच्या घरच्या पत्त्यावर पाठवून दिली. पठाणाने तो ग्रंथ उघडला.

त्यात अर्पण पत्रिका होती... 'हे पुस्तक मिळविण्यासाठी काबूलपासून कोलकात्यापर्यंत पायी आलेल्या त्या अनोळखी मुसाफिरास समर्पित...'

(Source : http://tinyurl.com/naefosx)







No comments:

Post a Comment

Thank you for visiting !