काही कथा - भाग ७
दांडी सत्याग्रहाची घोषणा केल्यानंतर महात्मा गांधी यांना मोतीलाल नेहरू (राहुल गांधी यांचे खापर पणजोबा) यांनी लांबलचक पत्र लिहिले. त्यात दांडी सत्याग्रहामुळे काहीही साध्य होणार नाही; तो कसा फसेल आदी मुद्दय़ांचा ऊहापोह केला.
गांधीजींनी पत्राचे उत्तर दिले- 'कर के देखो, तुम्हारा बापू.'
नेहरू नाराज झाले. पण नेत्याची इच्छा ही आज्ञा मानून त्यांनी दांडी सत्याग्रहाच्या स्थान व वेळेची घोषणा केली. सत्याग्रहाच्या दिवशीच रेल्वे स्थानकावर मोतीलाल नेहरू यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली.
तुरुंगात जाण्यापूर्वी नेहरू यांनी गांधीजींना तार पाठवली.
त्यात म्हटले होते- 'प्रिय बापू, बिना किये ही देख लिया!'
गांधीजींना जनमानसाची नाडी माहिती होती. कारण ते लोकांमध्ये मिसळत होते.
लेबनीज लेखक खलील जिब्रानची रूपककथा आहे.
सुरूपता आणि कुरूपता या दोन बहिणी, स्नानासाठी तलावात उतरल्या. वस्त्रं तळ्याच्या काठावर ठेवली होती. पाण्यात त्या मनसोक्त डुंबत होत्या. इतक्यात कुरूपतेला काहीसं आठवलं.....
ती लगबगीने तळ्याबाहेर आली. तिने सुरूपतेची वस्त्रं अंगावर चढवली आणि निघून गेली.
सुरूपता अजूनही पाण्यात डुंबतच होती. यथावकाश तीही पाण्याबाहेर आली; तर तिला दिसलं... की, कुरूपतेची वस्त्रं काठावर आहेत. ती घालून बाहेर पडण्याशिवाय तिला गत्यंतर उरले नाही.
तेव्हापासून भलंबुरं ओळखण्यात माणसाची गल्लत होऊ लागली.
साऱ्या सरोवरांचा मान असलेल्या मानसरोवरात विहरणारा हंस आणि तळ्यात व समुद्राच्या काठाकाठाने फिरणारा बगळा यांचा हा संवाद.
बगळा विचारतो. 'तू कोण आहेस ?' इतका शुभ्र... माझ्यापेक्षा कणभर अधिकच शुभ्र असा तू कोण? कोठला?
हंस उतरतो, 'मी तो आहे.... ज्याचे डोळे पाय आणि चोच लाल आहेत'
हंसाच्या उत्तरावर बगळ्याचा पुढचा प्रश्न. 'तू कोठून आलास?'
हंस म्हणाला 'मानसरोवरातून!'
बगळ्याने ते कधी ऐकलंच नव्हतं. तो म्हणाला, 'काय आहे हे'
हंस म्हणाला, 'तेथे सुवर्णकमळे डुलतात पाण्यावर, आणि पाणी इतकं गोड आहे की अमृतच. आणि सर्वत्र मोतीच मोती विखुरलेले. तो मोत्यांचा चारा मी खातो,'
बगळ्याने असे कधी ऐकलेले नव्हते.
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !