त्रिवेणी
मराठी मधे चारोळी हा प्रकार नवीन नाही, अलीकडे त्याला "चारोळी" हे नाव मिळाले इतकाच. कुसुमाग्रजांच्या काही कविता या प्रकारामधे मोडू शकतील . "त्रिवेणी" हा प्रकार मात्र मी फ़क्त व पहिल्यांदा वाचला गुलझारांचा . अनुवादन केल आहे शांता शेळके यानी . मेहता पब्लिशिंग हाउस प्रकाशित संग्रहाच नाव त्रिवेणी .
गुलझार म्हणजे मनाला भावणारया आणि सहज समजण्या सारख्या उर्दू रचना। कारण त्या उत्तम निरीक्षण शक्तीमुळे व कवीच्या अतिशय हळव्या स्वभावमुळे लिहिल्या गेल्यात अस मला वाटत शांता बाइनी त्या मराठीत फारच सुरेख अनुवादित केल्यात। मग मलाही वाटल एखादा प्रयत्न करावा !
त्याला ती पहिल्याच भेटीत मनापासून भावली होती,
तिने ही आपल्या जीवनसाथीबद्दल मत बनवली होती
दोन डोळे एकमेकाना भेटत नाहीत हेच खरे !
-------------------------------------------
दिवसभर कामानंतर चुल पेटवली, अन्न रान्धल
भाताच्या जोडीला छान माशाच कालवण होत....
दारुबरोबर काहीतरी चटपटीत चांगल लागत !
Read my more poems here.
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !