One liners by me




  • ज्यांना स्वत:ची मतं नसतात ते दुसऱ्यांच्या  मतांचे गुलाम असतात !

  • काळाला वेळेची बंधन नसतात, तो नित्यनियमाने व रीतसर पुढे सरकत रहातो.

  • जेव्हा काळ स्तब्ध वाटु लागतो, तेव्हा मृत्युला कवटाळणे शौर्याचे प्रतीक आहे !

  • जीवन म्हणजे काळेकुट्ट केस ! अनुभव म्हणजे कंगवा.  दु:खाची बाब इतकीच की हा कंगवा सरत्या आयुष्यात मिळतो.

  • भाषा वळवावी तशी वळत नाही, मात्र तिचा अर्थ लावावा तसा लागतो. लेखक कवी जेव्हा लिहितात त्यावेळी त्यांना लिखाणाबद्दल अपेक्षित अर्थ एकाच असतो, वाचक बहुतेक वेळा अर्थाचा अनर्थ करतो !

  • कर्तव्य जरी भावना असली तरी भावना आणी कर्तव्यात मला एक मुलभुत फरक जाणवतो. कर्तव्य माणसाला रडवत नाहीत, भावना रडवतात. 

  • मानसिक  शातंतेची गुरुकिल्ली माणसाच्या आंतरिक समाधानावर अवलंबुन आहे. आणी आंतरिक समाधान हे प्रत्येकाच्या वैचारीक कल्पना व तो जगात असलेल्या वातावरणावर अवलंबुन आहे.

  • भविष्यातील घटनांवर ताबा मिळवण्यासाठी वर्तमानातील षड-रीपुव र ताबा मिळवावा.

  • मनाचे रंग इंद्रधनुतल्या रंगाइतके आहेत. स्वत:चे रंग बदलण्यात तर ते chameleon पेक्षाही चतुर आहे.

  • निर्णय खंबीरतेने घ्या व तितकाच योग्य दिशेने. जर तुम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला असेल, तर तर तो शेवटचा असून शकतो.

By Paresh Kale


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !