Some of my facebook status update (Education)


Some of my facebook status update (Education)





"कह दो जाके उन टॉप करने वालों से...
जितना सिलॅबस वो पढ के टॉप करते हैं,
उतना तो हम छोड के पास हो जाते हैं!!

__________

"
पिक्चर संपला आणि सर्व लहान मुलं बाहेर आली ती स्पायडरमॅन बनूनच. मुलांच्या चित्काराने , हावभावांनी सर्वत्र मुलांचेच राज्य पसरल्याचे भासत होते. पिक्चरनंतर लहान मुलांच्या चौकसबुद्धीलाही ऊत आला होता. ' बाबा , मी स्पायडरमॅन होऊ शकतो का ?', ' कोणता स्पायडर आपल्याला चावला की आपण स्पायडरमॅन बनतो ?' अशा प्रश्नांची सरबत्ती पालकांवर मुलांनी सुरू केली होती.
त्यातील एक प्रश्न मात्र स्तंभित करणारा होता , ' बाबा आपल्याकडे स्पायडर असतात का ?' निसर्गाशी नाळ तुटलेल्या त्या लेकराच्या मुखातून आलेल्या या प्रश्नामुळे बाबांना काय उत्तर द्यायचे ते कळालेच नाही. अखेर ' मागल्या गणपतीत गावाला गेल्यावर आपल्या रूममध्ये आला होता ना ', अशी केविलवाणी आठवण बाबांना करून द्यावी लागली. तशी इतर बाबांची अवस्थाही काही वेगळी नव्हती.



Source: Maharashtra times 03 July 12

_______________



माझ्या मुलांना मी त्यांच्या वाढदिवसाला छानशी पुस्तके भेट देतो. त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर मनातल्या चार ओळी लिहितो. लहान मुलगा ज्ञानू रंग , रेषांशी खेळायचा. त्याला त्याच्या एका वाढदिवसाला थोर चित्रकार शिवाजी तुपे यांचे ' स्केच करता करता ' हे पुस्तक भेट दिले आणि त्यावर लिहिले ' प्रिय ज्ञानू , मिठामुळे जेवणाला चव येते नि कलेमुळे जीवनाला चव येते. ' आज तो कलेची साधना भक्तिभावाने करतो आहे.
मोठ्या तुषारला असेच एकदा ' खरेखुरे आयडॉल ' हे पुस्तक भेट दिले. त्या पुस्तकावर लिहिले , ' प्रिय तुषू , तुला हे पुस्तक याकरता भेट देत नाही , की तू या पुस्तकातील कुणा आयडॉलसारखा व्हावा. नाही. हे पुस्तक तुला यासाठी देतो आहे , की तू तुझ्यासारखा हो. कारण या पुस्तकातील कुणीही दुसऱ्या कुणासारखा झालेला नाही , तूही स्वत:सारखा हो. "                                                                   - कमलाकर देसले
_____________


"
आपण शाळेचे मालक आहोत, अशा थाटात शिक्षकांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या समस्त पालकांनी एकदा आपलंही बालपण आठवावं. एवढा मार खाऊन आपलं काही वाईट झालं नाही, उलट चांगलंच झालं, असं त्यांच्या लक्षात येईल.. शिक्षकांवर अविश्वास आहे, तो वाढतो आहे आणि कमी व्हायला हवा, हे लक्षात येत असूनही आपण असे वागतो आहोत..
शाळेत असताना आमच्या एका शिक्षकांनी आमच्याच वर्गात असलेल्या त्यांच्या मुलाला बेदम मारलं होतं. आजही तो मार अगदी काल घडल्यासारखा आठवतो. आपला मुलगा म्हणून त्याच्याकडे वात्सल्यानं पाहणं तर दूरच; पण त्याच्या चुकीबद्दल त्याच्या मित्रांसमोर चोपणं म्हणजे जरा जास्तच होतं, पण त्यामुळे त्या मुलाची कुणी टिंगल केली नाही, की त्या शिक्षकांबद्दल मनात आकस धरला नाही. तेव्हा शाळेतल्या शिक्षकांनी का मारलं, अशी तक्रार करण्याची पालकांची हिंमतच नव्हती. काटर्य़ानं नक्की चूक केली असणार, याबद्दल पालकांनाच अधिक खात्री असे. बरं, शिक्षक जेवढय़ा जोरात मारायचे, तेवढय़ाच प्रेमानं त्या मुलाला जवळही करायचे. त्याच्यासाठी तो एक अतिशय हळुवार प्रसंग असायचा.

चार-पाच मुलांचा संसार चालवण्यासाठी मिळणारा पगार न पुरणारे शिक्षक शाळेव्यतिरिक्त शिकवण्या घ्यायचे आणि त्यातून किमान वाण्याचं तरी बिल भागवायचे. मात्र शिकवणी न लावणाऱ्याकडे ते कधी वाकडय़ा नजरेनं पाहायचे नाहीत, कारण बऱ्याच मुलांच्या पालकांना जादा शिकवणी लावणे ही चैन वाटण्यासारखी स्थिती होती. पण एकूणच वातावरणात शिक्षकांना आपल्या ‘लाडक्या’ विद्यार्थ्यांना मार देण्याची अधिकृत परवानगी होती. गृहपाठ न केलेल्याला वर्गात दिवसभर बाकावर उभे राहायला लावणे, वर्गात दंगामस्ती केल्यास वर्गाच्या बाहेर पायाचे अंगठे धरायला लावणे, शाळेत उशिरा आल्यास हातावर वळ उमटेल, एवढय़ा(च) जोरात छडी मारणे, वर्गात कागदी बाण मारणे किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचा आवाज करणे अशा कारणांसाठी पाठीत धपाटा घालणे या शिक्षा ‘सामान्य’ या सदरात मोडत, पण अशा शिक्षकांच्या घरी दसरा आणि संक्रांतीला जाऊन सोनं देणे किंवा तिळाची वडी मिळवणे, हा मुलांचा हक्क असे. मुले दुपारपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या शिक्षकांच्या घरोघरी जात तेव्हा त्यांना हा मार किंवा शिक्षा आठवत नसे. मार खाणाऱ्या मुलाला वर्गातील इतर मुले सहसा चिडवत नसत, कारण अशी वेळ कुणावरही येऊ शकते, यावर सर्वाचा विश्वास होता.




_______________


"TEACHER         : Millie, give me a sentence starting with ' I. 

'MILLIE               : I is.....

TEACHER           : No, Millie..... Always say, 'I am.

'MILLIE                : All right... 'I am the ninth letter of the alphabet.'"


_____________


" Five reasons to skip college:

1. You'll be losing four working years.
2. You won't necessarily earn less money.
3. In fact, you could probably make more money if you invested your tuition.
4. You don't need to be in a classroom in order to learn something.5. Plenty of other people did fine..............
So those who are not interested in serious education, can find their own way of living life. Perhaps they are listening to a different drummer ! but please don't irritate your teacher.




Read more facebook updates here.





1 comment:

  1. Did you know that you can shorten your links with AdFly and receive cash from every click on your shortened links.

    ReplyDelete

Thank you for visiting !