दुरावा
या तरुतळी
एकलीच मी.
हात दे सख्या रे ,
घायाळ मी हरिणी.
पाहते वाट तुझी
आज तरी येशील तु !
अवस्था गुढ माझी
कानी शीळ देशील तु.
विरले आभाळ सारे
भिजवुनी सरला दिवस
पाय घरा परतले
रात्र पुन्हा एक अमावास.
मोजीत तारे रात्र चालली
चंद्रप्रकाशात रातराणी फुलली
नाही मला काय त्याचे
डोळ्यांनी रात जागली.
आयुष्य असे क्षणभंगुर
लावू दे तो भैरवीचा सूर
मिटवून टाक अंतरे
आज तरी ये बरे !
येशील स्वप्नात तू
इतके मज ठाव आहे
काय करू? अभागी नशीब आहे
डोळ्यात मात्र जाग आहे !
Read my more poems here.
Image Source: http://us.123rf.com/400wm/400/400/tenki/tenki1111/tenki111100001/11377695-girl-with-pink-frangipani-flower-sketch--vector-illustration.jpg
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !