श्रावण मास
ढगात दडले गुढसे काही
शोधीत वारा निघाला
सप्तरंगाच्या कमानीखाली
एक झंकार विसावला !
मावळतीच्या रंगात रंगुनी
आल्या श्रावण धारा
चिंब ओलावली ती तृणफुले
झाली पावन धरा !
पर्जन्य रूप, मेघ रूप सूर्य
सोबत रुपेरी छटा
आक्रन्दीले मेघांनी आकाश
श्रावण हा हवासा.
Read my more poems here.
Image: 'Sonaki' flowers at Kaas Plateau near Satara, Maharashtra
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !