रुपवती राजकन्या दूर देशाची,
सुखात न्हालेली , लाडात वाढलेली.
आरस्पानी सौंदर्य तनु मृदगंधित
लावण्यवती देखील सामान्य भासतीत !
जेव्हा तारुण्याने ओलांडली पायरी,
राजा वदला झाली कन्या उपवरी.
स्वयंवर ठरले पण तिचा बहु विचित्र
आणेल अश्रु डोळ्यात जो त्यास मी वरेन !
पुष्कळ राजे अनंत राजपुत्र आले,
जे जे हृदयद्रावक ते ते सांगुन गेले.
दु:खकथा, शौर्यकथा, सत्यकथा , मिथ्यकथा,
नाही तरी ढळला अश्रु राजकन्येचा !
झाला राजा निराश, पुत्री मात्र आशेवर,
शेवटी आला एक तरुण हाती उत्तर घेऊन.
वाहवीन अश्रू डोळ्यांतुन, असावा तो शेवटचा,
नजराणा आहे तुजसाठी, स्वीकार व्हावा खगोलाचा !
विस्मयचकीत झाली राजकन्या,
पाहून तारे अन चमचमत्या चांदण्या.
आनंदाने बेहोशीत अश्रू एक निसटला,
खगोलात पडताच लुप्त झाला !
पृथ्वीवर अवतरले तेव्हा पाणी,
मनुष्य जन्माची हीच खरी कहाणी !
सुखात न्हालेली , लाडात वाढलेली.
आरस्पानी सौंदर्य तनु मृदगंधित
लावण्यवती देखील सामान्य भासतीत !
जेव्हा तारुण्याने ओलांडली पायरी,
राजा वदला झाली कन्या उपवरी.
स्वयंवर ठरले पण तिचा बहु विचित्र
आणेल अश्रु डोळ्यात जो त्यास मी वरेन !
पुष्कळ राजे अनंत राजपुत्र आले,
जे जे हृदयद्रावक ते ते सांगुन गेले.
दु:खकथा, शौर्यकथा, सत्यकथा , मिथ्यकथा,
नाही तरी ढळला अश्रु राजकन्येचा !
झाला राजा निराश, पुत्री मात्र आशेवर,
शेवटी आला एक तरुण हाती उत्तर घेऊन.
वाहवीन अश्रू डोळ्यांतुन, असावा तो शेवटचा,
नजराणा आहे तुजसाठी, स्वीकार व्हावा खगोलाचा !
विस्मयचकीत झाली राजकन्या,
पाहून तारे अन चमचमत्या चांदण्या.
आनंदाने बेहोशीत अश्रू एक निसटला,
खगोलात पडताच लुप्त झाला !
पृथ्वीवर अवतरले तेव्हा पाणी,
मनुष्य जन्माची हीच खरी कहाणी !
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !